Nagpur NMC | एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग रचना करा, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील महानगरपालिका निवडणुका (Municipal elections) एक सदस्य किंवा द्विसदस्यीय पद्धतीने घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे यांनी केलीय. मनपा आयुक्त यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात आलंय.

Nagpur NMC | एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग रचना करा, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मागणीचे निवेदन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना देताना.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 11:20 AM

नागपूर : नवीन कायद्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) केलेली तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द करण्यात आलीय. आता आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीनं नवीन प्रभागरचना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे (NCP OBC cell state president Ishwar Balbudhe) यांनी केली. दोन सदस्यीय प्रभाग रचनेच्या मागणीसाठी बाळबुधे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहीलंय. नागपूर महानगरपालिका आयुक्तांमार्फत हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत गरबी उमेदवार निवडणूक लढू शकत नाही. त्यामुळे एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग पद्धती करुन आगामी मनपा निवडणूक घ्यावी, अशी मागणी ईश्वर बाळबुधे यांनी केलीय.

त्रिसदस्यीय प्रभाग मोठा

राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका त्रिसदस्यीय पद्धतीऐवजी एक सदस्यीय पद्धतीद्वारे घ्यावी. अशा मागणीचे निवेदन ईश्‍वर बाळबुधे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटल सेलचे व विभागाचे मुख्य समन्वयक सुहास उभे हे प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय संविधानानुसार सर्वसामान्य महिला, पुरुष यांना स्थानिक निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा मागासवर्गीय नागरिक साठ हजार मतदारांच्या प्रभागात निवडणूक लढवू शकत नाही. हा त्यांच्या अधिकारावर गदा आहे. त्यांच्यावर अन्याय आहे. निवडणुकीत 50 टक्के महिला लढणार आहेत. राजकीय आरक्षणानुसार त्रिसदस्यीय प्रभागात दोन मागासवर्गीय महिलांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांना एका पुरुषावर अवलंबून राहावे लागत आहे. यामध्ये महिला पुरुषांचा समीकरण बसत नाही. त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये प्रभाग हा फार मोठा असतो. अंतरसुद्धा तीन ते चार किलोमीटर लांब असते.

सर्वांना मिळावी संधी

यामध्ये एका टोकाचे लोक दुसऱ्या टोकाकडे तर नगरसेवक प्रभागाचे विकास काम करण्यास हेतुपरस्पर टाळाटाळ करतात. यामुळे विकास कामांना आळा बसतो. नागरिकांना असंख्य समस्यांना समोर जावे लागते. महापालिकेची निवडणूक फक्त धनाढ्य व्यक्तीकरिता राहू नये. सर्वसामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते इतर मागासवर्गीय महिला, पुरुष, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासारख्या प्रतिनिधींना स्थानिक राजकारणात संधी मिळावी. यासाठी एकसदस्यीय वार्ड पद्धती किंवा दोन सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक घ्यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष नगरसेवक दुनेश्वर पेठे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष जावेद हबीब, श्रीकांत शिवणकर, अशोक काटले, विशाल खांडेकर, महेंद्र भांगे, अॅड. नितीन देशमुख, डॉक्टर अनिल ठाकरे, बापू चरडे, प्रशांत बनकर, विजय गजभिये, शेखर पाटील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती बाबत हस्तक्षेप करा अन्यथा केंद्र आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन करणार;किसान सभा

Sanjay Raut फडणवीसांच्या गडात, नागपुरात सेनेचं शिवसंपर्क अभियान, शिवसेनेची चाचपणी

Police भरतीसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, NCC झालेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार : सुनील केदार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.