Nagpur Stamp Duty | मार्च एंडिंगची रजिस्ट्री कार्यालयात गर्दी, सर्व्हर बंद झाल्याने कामाचे तास वाढविले
सर्व्हर डाऊनमुळं (Server Down) काल अडचणी आल्या. यावर मात करण्यासाठी दोन तास कामाचे वाढविण्यात आले. सहा एवजी आठ वाजतापर्यंत ही कार्यालयं सुरू होती. नागपुरात रोज 25 ते 30 रजिस्ट्री होतात. पण, मार्च एंडिंगमुळं (March Ending) ही संख्या दुपटीनं वाढली आहे.
नागपूर : रेडिरेकनरचे दर एक एप्रिलपासून वाढणार आहेत. त्यामुळं मुद्रांक शुल्क (Stamp Duty) वाढणार आहे. शिवाय मेट्रोचा एक टक्के अधिभारही लागणार आहे. रजिस्ट्री करण्यासाठी खरेदीदारांनी तोबा गर्दी केली होती. नोंदणीची संख्या वाढल्याने सर्व्हरवर याचा परिणाम पाहायला मिळाला. सर्व्हर डाऊनमुळं (Server Down) काल अडचणी आल्या. यावर मात करण्यासाठी दोन तास कामाचे वाढविण्यात आले. सहा एवजी आठ वाजतापर्यंत ही कार्यालयं सुरू होती. नागपुरात रोज 25 ते 30 रजिस्ट्री होतात. पण, मार्च एंडिंगमुळं (March Ending) ही संख्या दुपटीनं वाढली आहे.
नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी
एक एप्रिलपासून घर, फ्लॅट, प्लॅाट, दुकान खरेदीवर एक टक्का स्टॅम्प ड्युटी वाढणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसांत मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी अनेक जण खरेदीचे व्यवहार उरकून घेतायत. नागपुरात रजिस्ट्री कार्यालयात नोंदणीसाठी लोकांची गर्दी वाढलीय. सध्या घर, फ्लॅट, प्लॅाट, दुकान खरेदीवर सहा टक्के मुद्रांक शुल्क भरावा लागतोय. पण एक एप्रिलपासून त्यात एक टक्का वाढ होणार आहे. त्यामुळे नोंदणी कार्यालयात प्रॅापर्टी नोंदणी करणाऱ्यांची गर्दी वाढली. नागपुरात पूर्वीपेक्षा 20 ते 30 टक्के नोंदणी करणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. महाविकास आघाडी सरकारने मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मेट्रोच्या कामकाजासंदर्भात बांधकामे सुरू आहेत त्यांच्यासाठी आहे.
उद्यापासून वाढणार 1 टक्के मुद्रांक शुल्क
राज्य सरकारने दस्तऐवज नोंदणी आणि तारण व्यवहारावर एक एप्रिलपासून मुद्रांक शुल्कावर एक टक्का अधिभार लावण्याचे आदेश दिले. या निर्णयानंतर नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त बोजा वाढणार आहे. मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत एक टक्का अधिभार लावू नये, अशी मागणी जनता करत आहेत. 1 एप्रिलपासून मेट्रो शहरांमध्ये 1 टक्के मुद्रांक शुल्क वाढणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुद्रांक शुल्काची रक्कम वाचविण्यासाठी मालमत्ता खरेदीतही झपाट्याने वाढ झाली आहे.