नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा (MP Cultural Festival) प्रोमो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते आज लॉंच करण्यात आलाय. अभिनेता संजय दत्त हे 17 डिसेंबरला खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. कोविडच्या सगळ्या नियमांचं पालन करत हे आयोजन केलं जाणार आहे. सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचासुद्धा सत्कार करण्यात येणार आहे.
नागपुरात सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन सुरू केलं होतं. मात्र, गेली दोन वर्षे कोविडमुळं ते होऊ शकलं नाही. या वर्षी हे आयोजन केले जात आहे. क्रीडा महोत्सवचं पण आयोजन केलं जात आहे. या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून अनेक कलाकारांना संधी मिळते. या वर्षी आमच्या समितीने नॅशनल, इंटर नॅशनल कलाकार बोलावलेत. अमिताभ बच्चन यांच्याशी मी बोललो. पण थोड्या अडचणी आहेत. आरोग्याच्या कारणानं ते येऊ शकणार नाहीत, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
तीन वर्षे सांस्कृतिक खासदार महोत्सवाचं आयोजन केलं गेलंय. गेली दोन वर्षे कार्यक्रम होऊ शकला नाही. यंदा आयोजन केलं आहे. कवी, साहित्यिक, नाट्य, चित्रपट या क्षेत्रांत अनेक कलावंत आहेत. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी हे आयोजन करण्यात येतंय. या महोत्सवात कलाकारांचा सत्कार केला जातो. कलेप्रती ऋण व्यक्त केली जाते. तालुकास्तरावर आयोजन व्हायला पाहिजे. वेगवेगळ्या राज्यांतील कलाकारांना संधी मिळायला हवी. कलाकारांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी हा प्रयत्न आहे.
यंदा समितीनं 17 डिसेंबरला संजय दत्त यांना उद्घाटनासाठी बोलावण्यात आलंय. पार्श्वगायक सुखविंदर सिंह, गायक कैलास खेर 18 डिसेंबरला येणार आहेत. 19 तारखेला कुमार विश्वास यांच्या काव्यमैफलीचं आयोजन करण्यात आलंय. 20 डिसेंबरला काणे बुवा प्रतिष्ठानंचा कार्यक्रम होईल. 21 डिसेंबरला राकेश चौरासिया व टीम येणार आहे. 22 ला गौतम बुद्धांच्या जीवनावर आम्रपाली हे महानाट्याचं आयोजन करण्यात आलंय. 23 ला दिव्यांग कलाकारांचा कार्यक्रम सय्यद पाशा यांनी आयोजित केलाय.