हेमांगीची बाई, ब्रा आणि बुब्स फेसबुक पोस्ट, ट्रोलर्सला धडा शिकवण्यासाठी कठोर कायदे करा, सायबर तज्ज्ञाचं गृहमंत्र्यांना पत्र
नागपुरातील एका सायबर तज्ज्ञांनी गृहमंत्र्यांना एक पत्र लिहून ट्रोलर्सला धडा शिकवण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. (Cyber Expert Ajit parase Wrote A letter To Home Minister Dilip Walse patil)
नागपूर : एखाद्या अभिनेत्रीने किंवा सेलिब्रिटींने चाकोरीबाहेरच्या विषयांना हात घातला तर ट्रोलिंग ठरलेली… संवेदनशील अभिनेत्री हेमांगी कवी हिने बाई ब्रा आणि बुब्स ही फेसबुक लिहिल्यानंतर तिलाही अशाच प्रकारे ट्रोल करण्यात आले तर काहींनी तिचं कौतुकही केलं. आता याच पार्श्वभूमीवर नागपुरातील एका सायबर तज्ज्ञांनी गृहमंत्र्यांना एक पत्र लिहून ट्रोलर्सला धडा शिकवण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
सायबर तज्ज्ञांचं गृहमंत्र्यांना पत्र
नागपुरातील सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना यासंबंधी एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. या पत्रातून सोशल माध्यमावरील छेडखानी आवरण्यासाठी तसंच ऑनलाईन छेडखानी रोखण्यासाठी कठोर कायदे करा, अशी मागणी नागपुरातील सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी गृहमंत्री दिपील वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे काय मागणी?
अभिनेत्री हेगांमी कवी यांनी बिनधास्तपणे ‘बाई, बुब्स आणि ब्रा’बाबत आपली मतं मांडली, पण या निमित्तानं पुन्हा एकदा ‘सायबरबुलिंग’ म्हणजेच, सोशल माध्यमावरील छेडखाणी सारख्या गंभीर विषयाची चर्चा सुरु झाली. हेमांगी कमी यांनी पोळ्या करतानाचं रिल सोशल माध्यमावर अपलोड केलं आणि त्यावर अनेक नकारात्मक कमेंट्स आल्या, या कमेंट्स सायबरुबुलिंगच्या प्रकाराचत मोडतात. “हेमांगीसारख्या असंख्य मुली आणि महिलांना रोज सोशल माध्यमावर सायबरबुलिंग म्हणजेच ऑनलाईन छेडखानीचा सामना करावा लागतो आहे.
आजच्या इंटरनेटच्या जगात ऑनलाईन होणारी छेडखानी मुली किंवा महिलांच्या मानसिक आरोग्यावर आघात करु शकते, किंवा सामाजिक जिवनात त्यांना बदनाम करु शकते, हा गंभीर गुन्हा असून, याला आवर घालण्यासाठी सायबरबुलिंग करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणारे कठोर कायदे करण्याची गरज, सायबर आणि सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी व्यक्त केली आहे.
सायबरबुलिंग, सायबरस्टाकिंग आणि सायबर हरॅशमेंट, हा एकच प्रकार आहे, सोशल माध्यमावर अश्लिल कमेंट्स किंवा चॅटिंग करणे, कुणाची फेक आयडी तयार करुण बदनामी करणे, नको त्या बाबी टॅग करणे, ब्लॅकमेलिंग करणे. मुली किंवा महिलांसोबत घडणारे असे सर्व प्रकार ऑनलाईन छेडखानीत मोडतात. आणि सोशल माध्यमात वावरताना याचा सर्वाधिक सामना महिला आणि मुलींना करावा लागतो.
ट्रोलर्सला धडा शिकवण्यासाठी कठोर कायदे करा
त्यामुळे इंटरनेटच्या जगात वावरताना, देश विदेशात कुठेही बसून महिलांची ऑनलाईन छेडखानी करु शकतो. सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या छेडखाणीतून महिलांना संरक्षण देण्यासाठी कठोर कायदे आपल्याकडे आहेत. पण ऑनलाईन छेडखाणी रोखण्यासाठी इतके प्रभावी कायदे नाहीत, त्यामुळे एखाद्या मुलीसोबत सायबरबुलिंगचा प्रकार घडला , तर त्या गुन्हेगाराला कुठुनही खेचून आणता येईल आणि पोलीस कोठडीपर्यंत पोहोचवता येतील, अशा कठोर कायद्याची आज खरंच गरज आहे.
‘बाई, बुब्स आणि ब्रा’पासून सुरु झालेली चर्चा एक चळवळ बनावी
तेव्हाच हेमांगी कवी सोबत घडलेला प्रकार इतर मुलींसोबत घडणार नाही. इंटरनेटचं जग आणि सोशल माध्यमाचा वाढता वापर, यामुळे आपलं समाजजीवन ढवळून निघालं आहे. सोशल माध्यमामूळे संपूर्ण जग एक ग्लोबल व्हिलेज झालं आहे. या माध्यमाच्या अनेक सकारात्मक बाजू आहेत. पण त्याच्या नकारात्मक बाजूंकडे दुर्लक्ष केल्यास, त्याची मोठी किंमत आपल्या आई- बहिणींना मोजावी लागू शकते. त्यामुळेच ‘बाई, बुब्स आणि ब्रा’पासून सुरु झालेली चर्चा एक चळवळ बनावी, आणि यातून धडा घेत आपल्या शासनकर्त्यांनी कठोर कायदे करावे
दुसरीकडे सोशल माध्यमं वापरणाऱ्या मुली आणि महिलांनी आपल्यासोबत ऑनलाईन छेडखानी घडल्यास, त्याची त्वरित पोलीस तक्रार करावी. जेणेकरुन अशा सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या वेळीच आवळणं शक्य होईल. आणि ऑनलाईन छेडखानीला आळा बसेल, असं आवाहन पारसे यांनी केलं आहे.
(Cyber Expert Ajit parase Wrote A letter To Home Minister Dilip Walse patil)
हे ही वाचा :
Video | वर्कआउट करताना हेमांगी कवीचा ठुमकत ठुमकत डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल