Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Corona | कोरोनाचा धोका वाढला, नागपुरात काल 29, आज 34 रुग्ण पॉझिटिव्ह, रेल्वेस्थानकावर टेस्टिंग

कोरोनावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने एक जून पासून 'हर घर दस्तक ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. 31 तारखेपर्यंत ही लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे.

Nagpur Corona | कोरोनाचा धोका वाढला, नागपुरात काल 29, आज 34 रुग्ण पॉझिटिव्ह, रेल्वेस्थानकावर टेस्टिंग
नागपूर रेल्वेस्थानकावर टेस्टिंग करण्यात येत आहे.
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 4:33 PM

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या नागपुरातही वाढत आहे. यामुळं कोरोनाचा पुन्हा धोका निर्माण झाला आहे. काल नागपुरात 29 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. आजचा आकडा नागपूरकरांच्या ह्रदयाचे ठोके वाढविणारा आहे. आज 34 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे. ही बाब लक्षात घेता पुढील धोका टाळणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना चाचणीसाठी पुढे येण्याबाबत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी (Radhakrishnan) यांनी केले. आता नागरिकही कोरोना चाचणीसाठी पुढे येत आहेत. यामध्ये मनपाच्या कर्मचा-यांनीही पुढाकार घेतला आहे. मनपाच्या (Municipal Corporation) उपद्रव शोध पथकाचे जवान, सफाई कर्मचा-यांसह अन्य कर्मचा-यांनीही कोरोना चाचणी करून घेतली. याशिवाय कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनीही शहरातील विविध भागात असलेल्या चाचणी केंद्रांवर (Test Center) जाऊन चाचणी केली.

शहरात फिरणाऱ्यांचीही चाचणी

शहरातील बाजारपेठा, रहदारीचे रस्ते, उद्यान, दुकाने, मंगल कार्यालय, खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या नागरिकांची चाचणी सर्व दहाही झोनमध्ये करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून मनपा हद्दीत कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करून त्यांचे निदान करणे गरजेचे आहे. शहरात विविध ठिकाणी काम करणारे, बाजारपेठेत फिरणाऱ्या नागरिकांमध्ये लक्षणे दिसत नसले तरी ते अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्ग होऊ शकते, त्यांची वेळीच चाचणी करून कोरोनावर नियंत्रण करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.

हर घर दस्तक मोहीम

कोरोनावर एकमेव उपाय म्हणजे लसीकरण आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने एक जून पासून ‘हर घर दस्तक ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. 31 तारखेपर्यंत ही लसीकरण मोहीम सुरू राहणार आहे. बारा वर्षावरील प्रत्येक बालकापासून वयस्क नागरिकांपर्यंत डोस देण्यासाठी घरापर्यंत लसीकरण टीम येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत 12 ते 18 वयोगटातील 777 मुलांना डोस दिला गेला आहे. याच वयोगटातील दुसरा डोस 759 मुलांना दिला गेला आहे. 18 वर्षावरील वयोगटातील 1567 युवकांना डोस देण्यात आला आहे. पहिल्या आठवड्यात 9 हजार 424 घरांना भेटी देण्यात आल्या आहे.

हे सुद्धा वाचा

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.