Nagpur | धोकादायक विजेचा शॉक! गेल्या बत्तीस महिन्यांत 547 जणांना गमवावे लागले प्राण, किती जनावरांचा झाला मृत्यू?
जिवंत विद्युत प्रवाहाने धोका घडतो. यामुळं जीवही गमावले जातात. गेल्या बत्तीस महिन्यांत राज्यात पाचशेच्यावर नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर : विजेचा शॉक हा धोकादायकचं. विद्युत धक्क्याने प्राणहानी होण्याचे अनेक प्रकार समोर येतात. एप्रिल गेल्या 32 महिन्यांत राज्यभरात विजेचा शॉक (Statewide electric shock) लागून सुमारे 547 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. एक हजार 911 प्राण्यांचाही मृत्यू झाला. अशी माहिती ही माहिती अधिकारातून (From the right to information) समोर आलीय. नागपूर शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत महावितरणकडे (To MSEDCL) विचारणा केली होती. त्यांना वरील माहिती देण्यात आली. एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत किती अपघात झाले. राज्यात विजेच्या धक्का लागून किती जणांचे बळी गेले. या दुर्घटनांमधील किती प्रकरणांत महावितरण जबाबदार होते. यापैकी किती जणांना आर्थिक सहकार्य मिळाले, हे सारे प्रश्न माहिती अधिकारातून विचारण्यात आले होते.
विदर्भातील अपघातांचे प्रमाण 32 टक्के
महावितरणकडून जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार, एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत राज्यभरात 547 नागरिकांच्या विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. एक हजार 911 प्राण्यांनाही याचा फटका बसला. या 32 महिन्यांच्या कालावधीत विजेच्या धक्क्यामुळे दोन हजार 657 प्राणांतिक अपघात झाले. या अपघातांपैकी 32.29 टक्के म्हणजेच 858 मृत्यू हे विदर्भातील होते.
तीन हजारांवर प्राण्यांचे अपघात
गेल्या बत्तीस महिन्यांच्या कालावधीत राज्यात तीन हजार 120 प्राण्यांचे प्राणांतिक अपघात झाले. त्यापैकी विदर्भातील एक हजार 183 प्राण्यांचा मृत्यू झाला. यातील 229 मृत व्यक्तींच्या वारसांना आठ कोटी 98 लाख रुपयांची मदत देण्यात आली. तसेच विद्युत धक्क्याने मृत्यू पावलेल्या 682 जनावरांच्या मालकांनाच आर्थिक मदत करण्यात आली. यासाठी दोन कोटी 23 लाख रुपयांची आर्थिक सहाय्यता मदत देण्यात आली आहे, अशी माहिती ही माहिती अधिकारातून मिळाली. अशाप्रकारचे अपघात टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी काही निधी राखीव ठेवणे गरजेचे आहे.