Nagpur ST | नागपुरात एसटी कर्मचाऱ्याने उचलले घातक पाऊल; का केला आत्महत्येचा प्रयत्न?

एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. त्यांना वेतनही मिळाले नाही. आर्थिक परिस्थिती खालावल्यानं एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

Nagpur ST | नागपुरात एसटी कर्मचाऱ्याने उचलले घातक पाऊल; का केला आत्महत्येचा प्रयत्न?
नागपूर बसस्थानक
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 6:18 AM

नागपूर : हिंगण्यातील सुरेश बोधले यांनी शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुरेश हे एसटीतील घाटरोड आगारात वाहक आहेत. त्यांच्यावर मेडिकल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. प्रशासनाने अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे ते बडतर्फ किंवा निलंबित नाही. संपामुळे ते नियमितपणे कामावर गैरहजर असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.

आत्महत्या करण्यापूर्वी बनविला व्हिडीओ

सुरेश बोधले यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी शेतात एक व्हिडीओ बनविला. त्यात त्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पगार झाले नसल्याचे सांगितले. शेतीच्या प्रकरणात प्रशासनातील अधिकार्‍यांकडून आपल्याला नाहक त्रास दिल्या जात आहे. पैशांची मागणी होत असल्याचा आरोप बोधले यांनी केला आहे. संप असल्यामुळे पैसा हातात नाही. आर्थिक परिस्थिती हलाकीची झाली असतानासुद्धा अधिकार्‍यांकडून पैसे मागितल्या जात असल्याचा आरोप बोधले यांनी केला आहे. आपल्या शेतीचा रस्ता दोन परप्रांतीय लोकांनी अडविला आहे. शेतीच्या प्रकरणात अधिकार्‍यांकडून तसेच परप्रांतीय लोकांकडून मानसिक त्रास होत आहे. आपण विष घेऊन आत्महत्या करीत असल्याचे बोधले यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महामंडळ प्रशासनाने दिली आहे.

आणखी 16 कर्मचारी बडतर्फ

एसटी महामंडळाच्या संपप्रकरणी आणखी 16 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सोमवारी या बडतर्फीचे आदेश काढण्यात आले. यात घाटरोड आणि इमामवाडा आगारातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कर्मचार्‍यांमध्ये 9 चालक, 6 वाहक आणि 1 यांत्रिकी पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचा समावेश असल्याची माहिती विभागीय नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.

एसटी महामंडळाचा अजब कारभार!

एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कारवाई सुरु आहे. पण नागपूर विभागातील प्रकाश राऊत संप सुरू होण्याच्या दोन महिन्यापूर्वीच निवृत्त झालेत. त्यांनाही एसटीने कामावर का येत नाही? म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावलीय. प्रकाश राऊत यांची एसटी महामंडळात 25 वर्षांची नोकरी झाली. 30 सप्टेंबर 2021 ला ते निवृत्त झाले. आता त्यांचा एसटीशी काहीही संबंध नाही, तरीही त्यांना एसटी महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पुण्यात ओमिक्रॉनच्या 28 रुग्णांची नोंद, महाराष्ट्राची संख्या 1247 वर

11 January 2022 Zodiac | आज या राशींच्या व्यक्तींनी खास काळजी घ्या ! संभाव्य धोका टाळा

नागपुरात सैन्यातील जवानाकडे सोन्याचं बिस्कीट सापडलं, धड उत्तर देईना, मग RPF जवानांनी…

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.