Nagpur | स्टेराईडचा अतिवापर धोकादायक! काय म्हणतात, अस्थिरोगतज्ज्ञ
स्टेराईड काही दिवसांसाठी ठिक आहे. नेहमीसाठी याची सवय लावून घेता कामा नये. स्टेराईडच्या अतिवापरानं हाडे ठिसूळ होताना दिसतात.
नागपूर : चांगले सुडौल शरीर असावे असे बहुतेकांना वाटते. पण, ते मेहनतीनं कमविलेलं असावं. सिक्स पॅक तर युवकांना चांगलीच भुरळ घालतात. हे सारे कमी वेळात कसे मिळविता येतील, यासाठी प्रयत्न सुरू होता. त्यातून स्टेराईडसारख्या औषधांचा वापर सुरू होता. पण, हा स्टेराईड काही दिवसांसाठी ठिक आहे. नेहमीसाठी याची सवय लावून घेता कामा नये. स्टेराईडच्या अतिवापरानं हाडे ठिसूळ होताना दिसतात.
पचनसंस्था का येते धोक्यात
कमी वेळात चांगली बॉडी कमवायची आहे तर मग व्यायामशाळेत जावे लागते. पण, त्याठिकाणी काही वस्तू खान्यासाठी देतात. यामुळं वजन तर वाढते. पण, पचनसंस्था धोक्यात येण्याची शक्यता असते. याचा वाईट परिणाम आपल्या शरिरावर होतो, अशी माहिती अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांनी दिली आहे. व्यायाम करण्यापूर्वी काही नियम पाळले गेले पाहिजे.
सुरुवातीला पाच मिनिटे वार्मअप करा
व्यायामशाळेत गेल्यानंतर काही जण बेसिक व्यायामाकडं दुर्लक्ष करतात. वार्मिअप, याकडं दुर्लक्ष केलं जातं. हे शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. कोणताही व्यायाम सुरु करण्यापूर्वी किमान पाच मिनिटे वॉर्मिंग अप आणि स्ट्रेचिंग अवश्य करावे. सावकाश सुरुवात करून मगच त्यात वाढ करावी. कोणताही खेळ खेळताना शरीराला तंदुरुस्तीची गरज असते, असं डॉ. संजीव चौधरी यांचं म्हणणंय.
जीमला जाण्यापूर्वी काय कराल
जीमला जाण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नका. झोप पूर्ण होऊ द्या. चहा-कॉफी घेऊन जीम करू नका. शरीराला ऊर्जा देणारे पदार्थ घेऊ नये. तसेच क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलू नये या अटी शर्थींचे पालन केल्यास तुम्ही नव्वदी नक्कीच ओलांडू शकता.