नागपुरात दिव्याच्या प्रकाशात काढत होते दिवस; दिवा पेटला, भडका उडाला नि होत्याचं नव्हतं झालं!
दारूच्या नशेत सागरला अचानक जाग आली. पाहतो तर काय मुलगा दिव्याच्या आगीत पेट घेत होता. त्याने कसेबसे मुलाला घराबाहेर काढले. आणि स्वतः त्या आगीत सापडला. सुद नसल्यानं तो स्वतःचे प्राण वाचवू शकला नाही. नशेत असला तर बापपण तो विसरला नाही.
नागपूर : शांतीनगरातील (Shantinagar) सागर रमेश भट वय सत्तीस वर्षे. पत्नी आणि मुलासोबत राहत होता. मुलगा रोहन अकरा वर्षांचा. पाण्याच्या टाकीजवळ रमेशचे घर आहे. पण, गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्या घरी वीज नाही. त्यामुळं दिव्याच्या प्रकाशात (In the light of a lamp) दिवस काढणे सुरू होते. पत्नी पल्लवी नणंदेकडे दोन मुलींसोबत बाहेर गेली होती. त्यामुळं दोघेचं बापलेक घरी होते. सागरला दारू पिण्याचे (Drinking ) व्यसन होते. मंगळवारी रात्री तो तसा दारू पिऊनच घरी आला. बायको घरी नव्हती. फक्त अकरा वर्षांचा मुलगा होता. दिवा पेटवून दोघेही झोपी गेले. दारूच्या नशेत सागरला अचानक जाग आली. पाहतो तर काय मुलगा दिव्याच्या आगीत पेट घेत होता. त्याने कसेबसे मुलाला घराबाहेर काढले. आणि स्वतः त्या आगीत सापडला. सुद नसल्यानं तो स्वतःचे प्राण वाचवू शकला नाही. नशेत असला तर बापपण तो विसरला नाही.
नेमकं काय घडलं
अकरा वर्षांचा रोहन घरी झोपला होता. आग लागल्यानं रोहनची झोप उघडली. त्याने आरडा-ओरड सुरू केली. सागरही नशेतून शुद्धीवर आला. सागरने रोहनला पोटाशी धरून घराच्या बाहेर ढकलले. मात्र, या प्रयत्नात तो स्वत: आगीत सापडला. घराला लागलेली आग पाहून घराबाहेर बरेच लोकं जमा झाले होते. सागरच्या मोठ्या भावाने आग लागल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाला दिली. शांतीनगर पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविली. त्यानंतर अग्निशमन विभागाचे कर्मचारी घरात शिरले. पाहतात तर काय सागर गंभीररित्या होरपळलेला होता. सागरला मेयो रुग्णालयात पाठविण्यात पाठविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी सागरला मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
बाप हा बाप असतो
सागर हा संगणक दुरुस्तीचे काम करायचा. त्यातून आलेल्या पैशातून घर चालवायचा. दरम्यान त्याला दारूचे व्यसन लागले. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास आग लागली असतानाही तो दारूच्या नशेत होता. पण, त्याला मुलाबद्दल प्रेम होते. त्यामुळं त्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलाला घराबाहेर काढले. पण, नशेत असल्यानं तो स्वतःला वाचवू शकला नाही. बाप हा बाप असतो, हे या घटनेवरून दिसून येतं.