Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Heavy Rain : कालच्या पूरपरिस्थितीनंतर नागपुरात आज काय स्थिती?; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बाधित भागाची पाहणी

DCM Devendra Fadnavis at Nagpur Sitabuldi Heavy Rain News नागपूरला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट; नागरिकांना सतर्क राहण्याचा हवामान खात्याचा इशारा. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्राऊंडवर.... ठिकठिकाणी पाहणी करतायेत अन् लोकांला धीर देत आहेत. वाचा...

Nagpur Heavy Rain : कालच्या पूरपरिस्थितीनंतर नागपुरात आज काय स्थिती?; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बाधित भागाची पाहणी
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 11:12 AM

नागपूर |24 सप्टेंबर 2023 : राज्यात सध्या विविध भागात मुसळधार पाऊस पडतोय. राज्याच्या काही भागात सरासरीच्या अधिक पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी पाहायला मिळतंय. नागपूरमध्येही धो-धो पाऊस कोसळतोत. त्यामुळे काल नागपूर शहरात पाणीच पाणी पाहायला मिळालं. दुकानं-घरांमध्ये पाणी शिरलं. यामुळे नागपूरकरांचं मोठं नुकसान झालं आहे. घरात पाणी शिरल्याने रोजच्या वापराच्या वस्तूंचं, तसंच अन्नधान्यांचंही मोठं नुकसान झालंय. या पावसाच्या पाण्यात खानपानाच्या वस्तू वाहून गेल्या आहेत. त्यामुळे नागपूरकर चिंतेत आहेत. अशात ज्या भागात पावसामुळे नुकसान झालं त्या भागात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

अतिमुसळधार पावसामुळे लोकांचं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त भागात पाहणी करत आहेत. स्थानिकांशी संवाद साधत देवेंद्र फडणवीस परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

आजही अलर्ट

नागपूरमध्ये अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. त्यामुळे नागपूरच्या काही भागात पाणी साचल्याचं चित्र होतं. नागपूरमधील समता नगर परिसरात काल 10-12 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं.  आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर यायला लागली आहे. पूर ओसरायला लागला आहे. यातून नागरिक सावरत असतानाच आता आजही हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचनाही हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

पूरग्रस्तांना सरकारचा मदतीचा हात

मुसळधार पावसामुळे नागपूरकरांचं मोठं नुकसान झालंय. यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेत बैठक घेतली. यात त्यांनी सरकारकडून करण्यात येणाऱ्या मदतीची घोषणा केली. नागपूरमधील पूरग्र्रस्तांना प्रत्येकी 10 हजार रुपये तातडीची मदत देण्यात येणार आहे. ज्यांच्या दुकानांचं नुकसान झालंय त्यांना 50 हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे. तर टपरीधारकांना 10 हजारापर्यंत मदत देण्यात येणार आहे. पुरामुळे काही भागात गाळ साचला आहे. हा गाळ काढण्यासाठी राज्य सरकारकडून निधी जाहीर करण्यात आला आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.