नागपूर विद्यापीठात Universal Health कोर्स, फक्त रोगमुक्तच नव्हे तर आरोग्ययुक्त व्हा
जनतेचा हेल्थ इंडेक्स वा आरोग्य पातळी वाढीस लावणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आरोग्यमय जगण्यासाठी आणि हा सगळा प्रपंच ऑनलाईन आहे. अगदी घरबसल्या याचा फायदा घेता येणार आहे. नागरिकांना योग्य आरोग्य संवर्धनासाठी या ऑनलाईन आरोग्य व्यवस्थेचा लाभ मिळवून घेता येईल.
नागपूर : आजच्या धकाधकीच्या जीवनात आजारांचे प्रमाण सतत वाढत आहे. अनेक उपचार करुनही बरे न होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही भरपूर आहे. खास करुन पोटविकारांचे वैद्यकशास्त्र दिवसरात्र प्रगती करीत असताना सुध्दा आजाराचे प्रमाण व तिव्रता ही वाढतानाच दिसत आहे. त्यातही जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. प्रत्यक्षात ते कमी व्हायला हवे होते. या परिस्थितीवर सखोल अभ्यास व संशोधन करुन यास पायबंद घालण्यासाठी डॉ. संजय गाडेकरांनी युएमएस हेल्थ रेगुलटरी सिस्टिम तयार केली आहे. अनेक उपचारांनी बरे न झालेल्या रुग्णासांठी योग्य ऑनलाईन मार्गदर्शन व रोगनिराकरण ( Disease Prevention) करण्यासाठीच या ऑनलाईन आरोग्य सेवेच्या संकेतस्थळाचे (Website) लोकार्पण जिल्हाधिकारी (Collector) आर. विमला यांचे हस्ते करण्यात आले.
आरोग्ययुक्त व्हा व राहा
या संकेतस्थळाचे नाव umshealth.live असे आहे. नागपूरातील वरिष्ठ जनरल व लॅपरोस्कोपीक सर्जन डॉ. संजय गाडेकर यांनी हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळाचे ब्रिदवाक्य ‘ फक्त रोगमुक्तच नव्हे तर आरोग्ययुक्त व्हा व राहा’ असे आहे. या संकेतस्थळाचे दोन मुख्य उद्देश म्हणजे आजारांनी त्रस्त लोकांची घरबसल्या ऑनलाईन आरोग्य मार्गदर्शन व आजार निराकरणाची सोय होणे व जनतेला आरोग्य शिक्षित करणे. कारण आरोग्य हे कुणालाही देता येत नाही. दान करता येत नाही. ते स्वत: शिकल्यावरच कमावता येते. जपता येते. यासाठी UNIVERRSAL HEALTH नावाचा ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स सुध्दा तयार करण्यात आला आहे. UMS HEALTH कोर्स राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरु करण्यात आला आहे. हा साठ तासांचा ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स आहे. बारावीनंतर कुणीही हा कोर्स शिकून आरोग्य पात्रता व हेल्थ इंडेक्स वाढवू शकतो.
रोगनिवारणाचे नियोजन
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना याचे चार क्रेडीट पॉईंटही मिळतील. ही आरोग्य पात्रता त्यांच्या शैक्षणिक डिग्री सर्टिफिकेटवर सुध्दा मुद्रीत असेल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेसोबत आरोग्य पात्रताही असावी जेणे करुन त्यांचे करिअर आरोग्य वर्धक ठरावे. येणारी पुढची पिढी ही आजच्यापेक्षा अनेक पटीने जास्त आरोग्यवर्धक निपजावी हा या कोर्स मागचा मुख्य उद्देश आहे. फक्त विद्यार्थीच नव्हे तर व्यावसायिक संस्था किंवा कार्यालयातील कर्मचारी व नोकरदारांसाठी सुध्दा हा कोर्स उपयुक्त आहे. थोडक्यात या संकेतस्थळाचा उद्देश आजारांनी त्रस्त लोकांच्या रोगनिवारणाचे नियोजन करणे.
Video | आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी? Raju Shetti म्हणतात, पक्षात सक्रिय नाही