Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Raut | तापमान वाढीमुळं विजेची मागणी जास्त, नागपुरात नितीन राऊत यांचं स्पष्टीकरण, केंद्र सरकारवर फोडलं भारनियमनाचं खापर

तापमान वाढीमुळं घरोघरी पंखे, कुलर, एसी सुरू आहेत. विजेची मागणी वाढली. त्यामानानं उत्पादनात वाढ झाली नाही. त्यामुळं भारनियमन करावं लागतंय, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. केंद्र सरकार सहकार्य करत नसल्याचा आरोपही राऊत यांनी केला. नागपुरात ते बोलत होते.

Nitin Raut | तापमान वाढीमुळं विजेची मागणी जास्त, नागपुरात नितीन राऊत यांचं स्पष्टीकरण, केंद्र सरकारवर फोडलं भारनियमनाचं खापर
नागपुरात बोलताना डॉ. नितीन राऊत.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 11:56 AM

नागपूर : संपूर्ण देशामध्ये विजेचं संकट निर्माण झालेलं आहे. कोरोना संपला आणि सगळे कामाला लागले. त्यामुळे विजेची मागणी वाढली, असं स्पष्टीकरण ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी दिलं. गेल्या महिन्यात तापमान वाढ झालेली आहे. त्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढलेली आहे. सोबतच आता सणासुदीचा काळ असल्यामुळे देखील विजेची मागणी वाढलेली आहे. मागणी आणि पुरवठा यामध्ये फरक आहे. त्यामुळं बाहेरून वीज घ्यावी लागते. अनेक ठिकाणी कोळसा उपलब्ध आहे. त्याठिकाणी रेल्वेच्या रॅक (racks of railways) मिळत नाही आणि ज्या ठिकाणी रॅक आहेत तिथे कोळसा उपलब्ध नाही, अशी परिस्थिती आहे. राऊत म्हणाले, विरोधक म्हणतात की, आम्ही कोळशाचा साठा केला नाही. पण आम्हाला रेल्वेनं रॅक उपलब्ध करून दिल्या नाही तर साठा कसा कसा करणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत विरोधकांना उत्तर (reply to the opposition) दिलं.

वीजचोरी होत असलेल्या भागात वीज भारनियमन

नितीन राऊत म्हणाले, आमच्याकडे प्लांट्स उपलब्ध असताना आम्ही शंभर टक्के आणि प्लांट चालवू शकत नाही. कारण आम्हाला केंद्राने साठा दिला असता तर आम्ही बाहेरून इंपोर्टेड साथ मागवला नसता. असं  म्हणत वीज निर्मितीचा संकट केंद्रामुळे निर्माण झालं आहे. असं म्हणत त्यांनी वीज निर्मितीचा संकट केंद्र सरकारमुळं निर्माण झालं असा त्यांनी आरोप केला आहे. ज्या भागामध्ये जास्त लॉस झाले आहे आणि ज्या भागांमध्ये वीजचोरी होत आहे. लोक बिल भरत नाही आहेत त्या भागांमध्ये  जास्त  लोड शेडिंग करण्यात येत आहे.

ग्रामविकास विभागाचा निधी आला नाही

लोडशेडिंगपासून जर वाचायचं असेल तर ऊर्जा मंत्री यांनी लोकांना विजेचा बिले भरण्याचा सल्ला देखील या निमित्ताने दिलेला आहे. ग्रामविकास विभागाचा निधी अजूनपर्यंत आमच्याकडे आलेला नाही. 9  हजार कोटींचा निधी राज्य शासनाकडे आहे. पण  काही अधिकारी म्हणतात, ग्रामविकास विभागाचा आणि नगर विकास विभागाचा जो निधी आहे त्यावरील व्याज माफ करा. त्याचं माफ केला तर सर्वसामान्य म्हणतील आम्ही काय बिघडवलं. तेही म्हणतील की आमचाही माफ करा म्हणून ते माफ करू शकत नाही, असंही राऊत यांनी सांगितलं.

Babasaheb Ambedkar | बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय अर्धवट! नागपुरातील संग्रहालय रखडल्याचे कारण काय?

Photo : Babasaheb Ambedkar Jayanti | नागपुरातील चिचोलीत बाबासाहेबांच्या वस्तूंचा संग्रह; ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया

Nagpur Education | मनपाच्या 6 इंग्रजी शाळा कार्यरत, मनपा आयुक्तांची शाळांना भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.