Karnataka election : कर्नाटकात भाजपची मतं कमी झाली नाहीत, गणित कुठं चुकलं? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

२०१८ साली भाजपच्या १०६ जागा आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला ३६ टक्के मतं होती. आता आम्हाला ३५.६ टक्के आहेत. अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी मतं भाजपची कमी झाली आहेत. परंतु, जागा ४० कमी झाल्या आहेत.

Karnataka election : कर्नाटकात भाजपची मतं कमी झाली नाहीत, गणित कुठं चुकलं? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
Follow us
| Updated on: May 13, 2023 | 8:04 PM

सुनील ढगे, प्रतिनिधी, नागपूर : भाजपला कर्नाटकमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही, हे सत्य आहे. जे निवडून आले त्यांचे अभिनंदन करतो. कर्नाटकमध्ये १९८५ पासून कुठलंच सरकार रिपीट होत नाही. सातत्याने ते बदलत असते. यावेळी तो ट्रेंड तोडू शकू असं आम्हाला वाटत होतं. पण, तो ट्रेंड तोडू शकलो नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण करताना ते म्हणाले, २०१८ साली भाजपच्या १०६ जागा आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला ३६ टक्के मतं होती. आता आम्हाला ३५.६ टक्के आहेत. अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी मतं भाजपची कमी झाली आहेत. परंतु, जागा ४० कमी झाल्या आहेत.

जेडीएसची मतं काँग्रेसकडे गेल्याने विजय

२०१८ मध्ये काँग्रेसला ३८ टक्के मतं होती. जनता दल सेक्युलरला (जेडीएस) १८ टक्के मतं होती. यावेळी जेडीएसची पाच टक्के मतं कमी झाली आहेत. ही जेडीएसची मतं काँग्रेसकडे ट्रान्सफर झाली आहेत. त्यामुळे काँग्रेसला हा विजय मिळाला आहे. भाजपची मतं ही कुठंही कमी झालेली नाहीत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

काही लोकांच्या प्रतिक्रिया मी ऐकतोय. त्यांना असं वाटतं की ते देशच जिंकले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल बघीतले पाहिजे की, त्यात काय अंतर असते, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

उत्तर प्रदेशात भाजपला मोठं यश

आजच उत्तर प्रदेशच्या लोकल बॉडीचे निकाल आले आहेत. उत्तर प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे. असं म्हणतात की, जे उत्तर प्रदेश जिंकतात तेच देश जिंकतात. उत्तर प्रदेशात भाजप वन साईडेड निवडून आली आहे. त्यामुळे कर्नाटक जिंकून जणू काही देश जिंकल्याचं काही लोकं सांगतात. याच्यामध्ये कुठलाही अर्थ नाही.

बेगामी शादीमे अब्दुल्ला दिवाना

बेगामी शादीमे अब्दुल्ला दिवाना, असेही काही लोकं मला पाहायला मिळतात. ज्यांच्या पक्षाला कर्नाटकमध्ये यश नाही. ज्यांच्या पक्षाला कर्नाटकमध्ये जागाही नाहीत. असेही लोकं नाचताना आपल्याला पाहायला मिळतात. हे लोकं जन्मभर दुसऱ्याच्या घरी पोरगा झाला म्हणून खुशी मनवतात. त्यांच्याबद्दल दुसरी काही प्रतिक्रिया देणं हे योग्य वाटत नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.