मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना कसं उघडं पाडलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

हे सरकार कसं प्रभाविपणे काम करतंय. हे विरोधकांना आणि महाराष्ट्राला लक्षात आणून दिल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना कसं उघडं पाडलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 7:53 PM

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले, विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपन्न झालं. दोन्ही सभागृहात भरपूर कामकाज या दोन आठवड्यात पार पडलं. सुरुवातीच्या काळात बहिष्कार झाला. सभागृह बंद पाडण्यात आलं. नंतरच्या काळात सकाळी नऊ ते अकरा-साडेअकरापर्यंत सभागृह चाललं. गेलेल्या वेळेची भरपाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणात अधिवेशनात कामकाज करण्यात आलं. विरोधी पक्षानं सुरुवातीला अधिवेशन बंद पाडण्याची भूमिका घेतली. नंतरच्या काळात अधिवेशनात पूर्ण सहभाग घेतला. अनेक महत्त्वाच्या चर्चा झाल्या. विदर्भात होणारं अधिवेशन विदर्भाला काहीतरी देऊन जाणार असलं पाहिजे, अशी अपेक्षा असते. या अधिवेशनात अत्यंत महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

धान उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी १५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना हा लाभ थेट बँकेच्या खात्यात मिळेल. छत्तीसगडमधून धान आणून बोनस कमविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता या निर्णयामुळं चाप बसेल. शेतकऱ्याचा बोनस शेतकऱ्याला मिळेल. व्यापाऱ्याला नाही. शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सिंचनाचे महत्त्वाचे प्रकल्प जाहीर केले आहेत. नागपूर-गोवा मार्ग घोषित केला आहे. पर्यटनाचे प्रकल्प जाहीर केले आहेत. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा टप्पा दोन मंजूर केला आहे. विदर्भवासीयांना मदत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.

विदर्भात ३५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. विदर्भ अजेंड्यावर ठेवून निर्णय झाले. विरोधी पक्षानी मांडलेल्या प्रश्नांना उत्तर देऊन विरोधी पक्षाला उघड पाडलंय. महापुरुषांचा विषय, राजकीय कारवायांचा विषय असो. उद्योग, सिंचन या विषयातील योग्य आकडेवारी मांडण्यात आली. हे सरकार कसं प्रभाविपणे काम करतंय. हे विरोधकांना आणि महाराष्ट्राला लक्षात आणून दिल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.