देवेंद्र फडणवीस-आशिष देशमुख यांची भेट, आशिष देशमुख भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार काय?

देवेंद्र फडणवीस यांनी नाश्त्याच्या आनंद घेतला. भाजपचे दिग्गज नेते भेटीला आले. राज्यातील पातळीवरील नेता अशी देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे.

देवेंद्र फडणवीस-आशिष देशमुख यांची भेट, आशिष देशमुख भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार काय?
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 2:43 PM

नागपूर : काँग्रेसमधून निलंबित असलेले आशिष देशमुख सध्या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. याचे कारण म्हणजे आज देवेंद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी आशिष देशमुख हे सावनेरमधून भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जाते. परंतु, आशिष देशमुख यांनी घोडामैदान अजूनही दूर असल्याचं सांगून यावर बोलणं टाळलं. आशिष देशमुख म्हणाले, राजकारणात कोणीही कोणाचे कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात. २०१९ ची विधानसभा निवडणूक मी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढलो. राजकारणात कालचे विरोधक आज मित्र असतात. मी काँग्रेसमधून निलंबित आहे. मला दिलेल्या नोटीसचे उत्तर दिले. पक्षविरहित राजकीय संस्कृती राज्यात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत. पक्षापलीकडे संबंध असतात.

सध्यातरी पक्ष बदलाचा प्रश्न नाही

मी काँग्रेसमधून निलंबित आहे. मला अपेक्षा आहे की, निलंबन मागे घेऊन अॅक्टिव्ह करण्यात येईल. २००९ मध्ये सावनेरमध्ये लढलो. २०१४ मध्ये काटोलमध्ये अनिल देशमुख यांचा पराभव केला. २०१९ ची निवडणूक मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढवली होती. सध्यातरी पक्ष बदलाचा प्रश्न उद्भवत नाही, असं आशिष देशमुख म्हणाले.

विदर्भाच्या विकासात फडणवीस यांची मोठी भूमिका

देशमुख यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस यांनी नाश्त्याच्या आनंद घेतला. भाजपचे दिग्गज नेते भेटीला आले. राज्यातील पातळीवरील नेता अशी देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. त्यांच्या माध्यमातून विदर्भात विकासाचे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. विदर्भाच्या दृष्टीने कोणी एकमेव काम करणारा असा नेता आहे.

हे सुद्धा वाचा

गेलच्या गॅसलाईनचे ८० टक्के काम झाले

अजून घोडामैदान लांब आहे. अद्याप कोणताही अर्थ काढू नका. विदर्भाच्या विविध प्रश्नांचा चालना मिळावी. समृद्धी महामार्गाच्या बाजूने गेल गॅसची पाईपलाईन टाकणार आहे. ही पाईपलाईन विदर्भातून नागपुरातून जाणार आहे. ८० टक्के काम झालं आहे.

विदर्भात फर्टिलायझर कॉम्प्लेक्स तयार व्हावा

इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स विदर्भात यावी, यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अमित शाह यांना निवेदन दिले. मध्य भारतात नॅनो डीएपी, अमोनियम नायट्रेड, नॅनो युरिया यांचा कारखाना नाही. तो विदर्भात व्हावा. याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्यांना मिळावा, अशी अपेक्षा आशिष देशमुख यांनी व्यक्त केली.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.