Devendra Fadnavis : जनतेचा चोरी गेलेला कौल आम्ही परत मिळवला, गनिमी काव्यानं सरकार आणलं; फडणवीसांचं रोखठोक विधान

मोदी शहा नसते तर नागपूरचा माणूस कधीच मुख्यमंत्री झाला नसता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी आदेश दिला तर मी घरी बसायलाही तयार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले

Devendra Fadnavis : जनतेचा चोरी गेलेला कौल आम्ही परत मिळवला, गनिमी काव्यानं सरकार आणलं; फडणवीसांचं रोखठोक विधान
नागपुरातील भव्य स्वागतावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 2:41 PM

नागपूर : आपल्याशी बेईमानी झाली. पाठीत खंजीर खुपसला गेला. आपला मॅनडेट पळवला गेला. जनतेचा कौल चोरीला गेला. पण चोरी गेलेला कौल पुन्हा एकदा आम्ही परत मिळवला आहे, असे रोखठोक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरमध्ये आले असता त्यांचे स्वागत करण्यात आले. या रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, की हा तुमचा कौल आहे. ही तुमची मानसिकता आहे. या तुमच्या आमच्या आकांक्षा आणि अपेक्षा आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेना भाजपा (Shivsena BJP) युतीचे नव्याने सरकार महाराष्ट्रात आले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपले मुख्यमंत्री आहेत. नागपूरचे हे स्वागत ठाणे आणि मुंबईलाही ऐकायला गेले पाहिजे, असे ते म्हणाले.

‘रोज मला वाईट वाटायचे’

महाविकास आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, की अडीच वर्ष अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार होता. राज्यात गव्हर्नन्स नावाचे काम करत नव्हती. अनेक राजे काम करत होते. कोण कुणाचे ऐकत नव्हते. सामान्य माणसांचे कोणी ऐकत नव्हते. त्यामुळे आपण शिवरायांचे वंशज आहोत. छत्रपतींनी जो गनिमी कावा सांगितला त्याच गनिमी काव्याने पण निधड्या छातीने हे सरकार महाराष्ट्रात आले. रोज मला वाईट वाटायचे. संताप व्हायचा, असे ते म्हणाले.

‘शाह यांचे आशीर्वाद आमच्या पाठी’

मोदींच्या नेतृत्वात आपण महाराष्ट्र पुढे नेत होतो. त्याला खिळ बसली. प्रोजेक्ट रखडले होते. विदर्भावर तर अन्याय होत होता. विदर्भातील निधी पळवला होता. मराठावाडा आणि विदर्भावर अन्याय केला जात होता. मोदींच्या नितीवर न चालणारे हे सरकार होते. आता महाराष्ट्र विदर्भाला प्रगतीवर नेणारे सरकार महाराष्ट्रात आले आहे. अमित शाह यांचे आशीर्वाद आमच्या पाठी होते. म्हणूनच आम्ही काम करू शकलो. जेपी नड्डा यांचेही यावेळी त्यांनी आभार मानले.

हे सुद्धा वाचा

‘मोदींशी बोलल्यावर सरकारमध्ये सहभागी झालो’

सरकार बनवेल पण सरकारमध्ये जाणार नाही, अशी घोषणा मी केली. पण राष्ट्रीय अध्यक्षांनी माझे नाव अनाऊन्स केले. जेपी नड्डा आणि शहा बोलले. पंतप्रधान मोदींशी बोलल्यावर मी सहभागी झालो. शेवटी पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे. मोदी शहा नसते तर नागपूरचा माणूस कधीच मुख्यमंत्री झाला नसता, असे ते म्हणाले. त्यांनी आदेश दिला तर मी घरी बसायलाही तयार आहे. पण त्यांनी तर माझा सन्मान केला. त्यांनी सांगितले भाजपाच्या संपूर्ण 106 लोकांचं नेतृत्व तू करत आहेस, तू सरकारमध्ये जा आणि उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घे आणि मी जबाबदारी स्वीकारली, असे फडणवीस नागपुरात म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.