‘असं’ काम करा…; देवेंद्र फडणवीसांनी दिला कार्यकर्त्यांना विधानसभा जिंकण्याचा मंत्रा

Devendra Fadnavis on BJP Karykarta : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना पक्ष संघटनेवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या कार्यशैलीवर आपलं मत मांडलं. तसंच राज्य सरकारच्या योजनांवरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. वाचा सविस्तर....

'असं' काम करा...; देवेंद्र फडणवीसांनी दिला कार्यकर्त्यांना विधानसभा जिंकण्याचा मंत्रा
देवेंद्र फडणवीसImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 8:37 PM

आज नागपुरात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा ‘मंत्रा’ भाजप कार्यकर्त्यांना दिला. आपले कार्यकर्ते चांगलं काम करतात. मात्र विरोधकांप्रमाणे मार्केटिंग करत नाहीत. आता आपली काम तुम्ही लोकांना दाखवा. हे लोक एवढे हुशार आहेत. ते निवडणुकी पुरत्या घोषणा करतात आणि मार्केटिंग करतात. त्यामुळे तुम्ही आपलं मार्केटिंग करा. आपलं काम जनतेला दाखवा. अनेक कार्यकर्ते थकले होते. चालते तर चालू द्या… असं करत होते. अनेक चमकेश कार्यकर्ते आपल्याकडे आहेत. ते कॅमेरा पाहून काम करतात ते आता विसरा… असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कुणाला टोला?

सावनेरमध्ये महायुतीचा झेंडा फडकणार आहे. जिल्हा बँक घोटाळा 22 वर्ष पूर्वी झाला. त्यांना कोर्टाने शिक्षा दिली. पण ते म्हणतात भाजपवाले आमच्या मागे लागले… भाजप कोर्टाला सांगते का यांची वसुंली करा यांना सजा द्या…?, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सुनील केदार यांचं नाव न घेता टीका केली आहे.

जिल्हा बँक जिवंत असती तर माझ्या शेतकऱ्यांना इतका त्रास सहन करावा लागला नसता. पण ते लोक असं दाखवतात त्यांनी खूप मोठी मर्दुमकी दाखवली… अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी बनवलेला सिपी आरोप करतो. सीबीआय केस दाखल करतात. कोर्टाने जेलमध्ये पाठवलं. पण आज ते म्हणतात फडणवीस माझ्यावर कारवाई करायला सांगतात… माझं नाव सध्या फार लाडकं झालं जो तो घेतो…, असं म्हणत देवेंद्र फडणणवीस यांनी अनिल देशमुखांना टोला लगावला.

जनता माझं कवच कुंडल- फडणवीस

यांच्यावर बोलणं मी माझा कमी पण समजतो. मात्र नागपूर जिल्ह्यातील लोकांना माहीत असावं म्हणून मी बोलावं. त्यांना माहीत आहे. यांच्यावर अटॅक केला की यांना कमी करता येऊ शकतं. घेरता येऊ शकतं. म्हणून यांची लोक सकाळी उठले की भोंगे वाजवतात. मात्र देवेंद्र फडणवीसची ताकत ही जनता आहे. माझे कवच कुंडल जनता आहे. अभिमन्यूला चक्रव्युव्हमध्ये जात आलं. पण बाहेर येत आलं नव्हतं. मात्र मी तसा नाही मी चक्राव्ह्युव्ह भेदून बाहेर येणार आहे. कारण माझी ताकत माझी जनता आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.