भडकावू स्टेटमेंट देऊन काही नेत्यांचा… संभाजीनगरातील राड्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?

संभाजी नगरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संभाजीनगरात आता शांतता आहे. सर्वांनीच शांतता राखावी. अफवांवर विश्वास ठेवू नये असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भडकावू स्टेटमेंट देऊन काही नेत्यांचा... संभाजीनगरातील राड्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?
devendra fadnavisImage Credit source: ani
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 12:58 PM

नागपूर : संभाजीनगरमध्ये काल रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक केली. जाळपोळ करण्यात आली. पोलिसांच्या वाहनांसह 20 वाहनांना आगी लावण्यात आल्या. या राड्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रमजान महिना सुरू आहे. आज रामनवमी आहे. त्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संभाजीनगरातील लोकांना शांत राहण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच काही राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी उलटसुलट विधाने करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

संभाजीनगरची घटना दुर्देवी आहे. तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भडकावू स्टेटमेंट देऊन परिस्थिती चिघळवण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीतमध्ये नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे समजून घेण्याची अवश्यकता आहे. कोणी चुकीची स्टेटमेंट देत असतील तर ती देऊ नये. सर्वांनी शांतात पाळावी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. याला कोणी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर यापेक्षा दुर्देव काहीच नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

एकमेकांसमोर येऊ नका

अशा प्रकारचे स्टेटमेंट देणं हे कोत्या मनाचं लक्षण आहे. आता संभाजीनगरात शांतता आहे. हीच शांतता राहिली पाहिजे. असा प्रयत्न सर्वांनाच करावा लागेल. काही नेते स्वत:च्या स्वार्थासाठी तिथली राजकीय परिस्थिती बिघडली पाहिजे असा प्रयत्न करत आहेत. तो त्यांनी तात्काळ बंद करावा. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी शांततेने कार्यक्रम पार पाडावा. कुणीही एकमेकांच्या समोर येऊ नये, असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.

त्यांना कोर्टाची कारवाई समजत नाही

यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नपुंसक या शेऱ्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. असं कोणतंही निरीक्षण केलेलं नाही. महाराष्ट्र सरकारने काय काय कारवाई केली हे दाखवल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राविरोधात कारवाई केली नाही. कंटेम्प्ट केला नाही. इतर राज्यात काय काय होतं आणि फक्त महाराष्ट्रालाच कसं फोकस केलं जातं हे सरन्यायाधीशांनी दाखवून दिलं आहे. जाणीवपूर्वक कोर्टाचं कुठलं तरी वाक्य काढून बोललं जात आहे. या लोकांना न्यायालयाची कारवाई समजत नाही, अशी टीका त्यांनी केली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.