बहिणींनो, काळजी करू नका, ‘तरिही’ तुम्हाला पैसे मिळतील; देवेंद्र फडणवीसांनी काय शब्द दिला?
Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजनेवर त्यानी भाष्य केलं. तसंच लेक लाडकी योजनेचाही त्यांनी उल्लेख केला. वाचा सविस्तर...
लाडकी बहीण योजनेमुळे आपली मतं वाढणार आहेत. पुढच्या मार्च महिन्यापर्यंतचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बजेटमध्ये ठेवले आहेत. काही लोक लाडकी बहीण विरोधात हायकोर्टात गेले होते. मात्र कोर्टाने त्यांची विनंती स्वीकारली नाही. ज्यांचे फार्म अपडेट झाले नाही. त्यांनीही काळजी करण्याची गरज नाही त्यांचे पुढच्या महिन्यात अपडेट झाले तरी पैसे मिळेल. आपण लेक लाडकी योजना आणली. त्यातून 1 लाख रुपये मिळणार आहेत. महाविकास आघाडी वाले रोज सांगतात गॅसचे भाव वाढले. पण आम्ही वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणार आहोत. मुलींचं शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शरद पवारांना टोला
नागपूर भाजप जिल्हा विस्तारित कार्यकरींनी बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तेव्हा बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. सोलरच्या माध्यमातून वीज जाणार दिली वीज चे काही दर वाढले होते. त्यातून सोलरची पंपची व्यवस्था केली. शरद पवारसाहेब विचारतात या योजनांसाठी पैसे कुठून आणणार? त्यांनी आधी राहुल गांधी यांना विचारावं ते खटाखात कुठून देणार होते, असा खोचक टोला देवंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
राज्य सरकारच्या योजनांवर भाष्य
तरुणांच्या हाताला काम मिळावं. म्हणून योजना आणली. त्यात 10 लाख विध्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना केंद्रसोबत आपले 6 हजार दिले 1 रुपयात विमा उतरविला हा देशात रेकॉर्ड आहे. कापूस, सोयाबीनचे भाव कमी झाले. त्याच्यासाठी आपण निर्णय घेतला होता. मात्र मग आचारसंहिता लागली. आता ती मदत आपण करणार आहोत. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला. आपले निर्णय यांच्यासारखे नाहीत. निवडणूक झाले की बंद केलं… तर या योजना या पुढेही सुरुच राहणार आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना आणली त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. नागपूर जिल्ह्यात विकास गंगा गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही आणली. नळ गंगा योजना आम्ही आणली त्याला पुढच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळेल. माझ्या विदर्भाचं मी देणं लागत म्हणून मी सगळ्या योजना आणतो. मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपण विदर्भात आणल्या, असं फडणीस यावेळी म्हणाले.