विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,

Devendra Fadnavis on Vinod Tawde Diary News : भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक काळात पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवर भाष्य केलं आहे. तसंच मतदारांना फडणवीसांनी महत्वाचं आवाहन केलं आहे. वाचा सविस्तर...

विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,
विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 12:12 PM

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. आज मतदान होत आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी काल भाजपचे वरिष्ठ नेते, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी कालच बोललो आहे. विनोद तावडे यांनी कुठेही पेसै वाटलेले नाहीत. ना त्यांच्या जवळ पैसे मिळाले. जाणून बुजून गोंधळ निर्माण केला जात आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस यांचं सहकुटुंब मतदान

देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. पत्नी अमृता फडणवीस आणि आईसोबत मतदान केंद्रावर जात देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केलं आहे. मतदान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मतदान करण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय आवाहन केलं?

लोकशाहीचा उत्सव सुरु आहे. या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाहीये. तर आपलं कर्तव्य देखील आहे. म्हणून मी माझ्या कुटुंबासकट मतदानाचा हक्क बजावलेला आहे. महाराष्ट्रातील तमाम बंधू- भगिनींना मी सांगू इच्छितो की सर्वांनी मतदान करा. लोकशाहीमध्ये आपण सरकारकडून अपेक्षा ठेवतो. त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी जरूर मतदान करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

मला वाटतं मतदानाचा टक्का यावेळेला वाढेल, असं मला निश्चितपणे वाटतं. लोकसभा निवडणुकीत याद्यांमध्ये घोळ होता. यावेळी काही प्रमाणात तो कमी झालेला आहे. लोकसभेला मतदान प्रक्रिया अत्यंत हळूवार पद्धतीने सुरु होती. यावेळी सिस्टिमध्ये बदल करण्यात आला आहे. लोकसभेसारखं रणरणतं ऊन यावेळी नाहीये. त्यामुळे लोक घराबाहेर पडून मतदान करतील, असं विश्वास आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणं आवश्यक आहे. प्रत्येकाने मतदान करा. यावेळी लाडक्या बहिणी देखील घराबाहेर पडून मतदान करतील, असा विश्वास आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.