Special Report : नागपुरात शिवसेनेच्या कार्यालयाची विभागणी, महिला कर्मचारी झाले भावूक, कारण काय?
कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो भिंतीवरून उतरवून नव्या कार्यालयात आणले.
नागपूर : शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. सत्ता संघर्षाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. आता कार्यालयामध्येसुद्धा वाटण्या होत आहेत. आधी पक्षात फूट पडली. नंतर धनुष्यबाण चिन्ह गोठलं. आता कार्यालय विभागलं. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झालं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटाला मिळालं. ठाकरे गटाला दुसरं कार्यालय देण्यात आलं. ठाकरे गटाचं कार्यालय बहुमतामुळं मिळालं. त्यानंतर काही भावनिक क्षणही कॅमेऱ्यात कैद झालेत. ठाकरे गटानं कार्यालयातल्या इतर वस्तूंबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही काढला. कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो भिंतीवरून उतरवून नव्या कार्यालयात आणले.
शिंदे गटाला म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना यांना पक्ष कार्यालय मिळालं. फोटो, फाईल्स काढल्या गेल्यात. त्यानंतर शिंदे गटानं तिथं बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा, आनंद दिघे यांची प्रतिमा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा लावली.
प्रतिमा काढत असताना तिथल्या कार्यालयातील कर्मचारी भावून झालेले पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे लोकं विखुरले आहेत. ज्यांच्यामुळं हे झालं त्यांना काही वाटत नाही. कर्मचारी हे त्यांच्या भावना दाखवत असल्याचं संजय शिरसाठ यांनी सांगितलं.
शिंदे आणि ठाकरे गटाची कार्यालयं वेगवेगळी झालीत. ज्याठिकाणी आधी शिवसेनेचं कार्यालय असायचं त्याठिकाणी आता शिंदे गटाचे आमदार, मंत्री येतील. ठाकरे गटाला नवं कार्यालय देण्यात आलंय.
रविभवनात बराक क्रमांक पाच हे दालन ठाकरे गटाला देण्यात आलंय. त्याठिकाणी अंबादास दानवे विरोधी पक्षनेता विधान परिषद अशी पाटी लागली आहे. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले.