शिक्षक परिषदेकडून नागो गाणार यांची उमेदवारी जाहीर, भाजपचा पाठिंबा मिळणार का?
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीचे लक्ष आता भाजपच्या ताब्यातील शिक्षक मतदारसंघावर आहे.
नागपूर, नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक (Divisional Teacher Council Election Nagpur) कायमच प्रतिष्ठेची मानल्या जाते. भाजपचा गड मानल्या जात असलेल्या नागपूरात पक्षाचा पाठिंबा कोणाला मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. अशातच यंदा मात्र संभ्रमाची परिस्थीती पाहायला मिळत आहे, कारण निवडणूकीचा अर्ज दाखल करण्याची तारिख आली असतांनाही भाजपाने अद्याप कोणत्याच उमेदवाराला जाहिर पाठिंबा दिलेला नाही. नागपूर शिक्षक मतदारसंघातून सलग दोनवेळा विजय मिळवणारे विद्यमान आमदार नागो गाणार यांच्याशी Tv9 मराठीने बातचीत केली.
काय म्हणाले नागो गाणार?
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत भाजपने आजपर्यंत कधीच अधिकृत उमेदवार उभा केलेला नाही, परंतू प्रत्येक निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्याच उमेदवारालाच पाठींबा दिला आहे तसेच निवडूणही आणले आहे. त्यामुळे या बाबत कुठला पेच निर्माण झाला असे समजन्याचे कारण नाही असे आमदार नागो गाणार म्हणाले.
योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कार्यपध्दती भरतीय जणता पक्षाची आहे आणि ती पद्धती ते पूर्ण करणार आहे असेही ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद हे वेगवेगळे युनिट आहेत, भाजप हा राजकिय पक्ष आहे तर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद ही शिक्षण क्षेत्रात काम करणारी स्वतंत्र संस्ठा आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद आपला उमेदवार जाहीर करते आणि भाजपला पाठिंबा देण्याची विनंती करते, भाजपसुध्दा या विनंतीला मान देउन पाठिंबा देते असेही नागो गाणार म्हणाले.
महाविकास आघाडीचेही लक्ष
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानंतर महाविकास आघाडीचे लक्ष आता भाजपच्या ताब्यातील शिक्षक मतदारसंघावर आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.