साहित्यिक राम शेवाळकर यांचा बालकीर्तनकार, शिक्षक ते प्राचार्य असा प्रवास माहीत आहे का?
रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा. तेही वेदशास्त्र संपन्न होते. लहानपणापासून शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून (Nagpur University) संस्कृत आणि मराठी विषयातून एम. ए. केले.
परभणी जिल्ह्यातले शेवाळ हे राम शेवाळकरांचे (Ram Shewalkar) मूळ गाव. शेवाळकरांचा जन्म दोन मार्च 1931 रोजी झाला. त्यांचे मूळ आडनाव धर्माधिकारी. अमरावती जिल्ह्यातील अचलपुरास (Achalpur in Amravati District) राहायला आल्यावर ते शेवाळकर झाले. गोपिका या त्यांच्या आई तर बाळकृष्ण हे त्यांचे वडील. बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या वडिलांनी पासष्ट वर्षे कीर्तन करून लोकांमध्ये जनजागृती केली. लहान वयातचं कीर्तन पाठांतर करून ती सादर करत. त्यामुळं त्यांच्यात अमोघ वाणी आली. रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळ करांचे पणजोबा. तेही वेदशास्त्र संपन्न होते. लहानपणापासून शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून (Nagpur University) संस्कृत आणि मराठी विषयातून एम. ए. केले. त्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशिम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. त्यानंतर यवतमाळ, नांदेड, वणी येथील महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून कित्तेक विद्यार्थी घडविले.
वक्ता दशसहस्त्रेषू अशी ओळख
1994 साली गोव्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती, भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद अशा संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. विदर्भातील डॉ. मुंजे, बाबासाहेब खापर्डे, पु. भा. भावे, बाळशास्त्री हरदास यांचा राम शेवाळकर प्रभाव पडला. स्वतःच्या वक्तृत्व गुणाचा विकास केला. राज्याबाहेरही त्यांनी व्याख्याने दिली. वक्ता दशसहस्त्रेषू, अशी ख्याती त्यांना प्राप्त झाली. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी यांचे विचार त्यांनी श्रोत्यांपर्यंत पोहचविले.
साहित्य धुरंधर पुरस्काराने सन्मानित
लहानपणापासूनच ते काव्यरचना करत. असोशी हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतर रेघा, अंगारा हे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. अग्निमित्र, अमृतझरा, देवाचे दिवे, रूचिभेद, सारस्वताचे झाड, तारकांचे गाणे हे त्यांचे काही ललित निबंधसंग्रह प्रसिद्ध झाले. शिक्षणविचार, यशोधन, त्रिविक्रम या पुस्तकांचे संपादनही त्यांनी केले. विशेष म्हणजे विदर्भ साहित्य संघाचे ते नऊ वर्षे अध्यक्ष होते. साहित्य धुरंधर पुरस्कार (अमेरिका), दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा कुसुमाग्रज पुरस्कार, विदर्भ भूषण पुरस्कार, नागभूषण पुरस्कार आदी मोठ्या पुरस्काराचे ते मानकरी ठरले. नागपूर येथे तीन मे 2009 रोजी त्यांचे निधन झाले.