डॉ. नितीन गडकरी यांनी सांगितलं आयुर्वेदाचं महत्त्व
मला आतापर्यंत 3 डॉक्टरेट मिळाले आणि पुन्हा मिळणार आहे. मात्र मी डॉक्टर शब्द लावायला थोडं मागे असतो, असंही गडकरी म्हणाले.
नागपूर : आयुर्वेदाला विश्वाच्या पटलावर तुम्हाला पोहोचवायचं आहे, हे लक्षात ठेवा. जगाने आपल्याला स्वीकारण्यासाठी आपल्याला त्या स्टॅंडर्डमध्ये मार्केटमध्ये यावं लागेल असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. आयुर्वेदिक पर्व या तीन दिवशीय संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. अनेक डॉक्टर आपल्या पॅथीमध्ये काम करतात. अध्ययनसुद्धा करतात. मात्र ग्रामीण भागात काही डॉक्टर वेगवेगळ्या पॅथी उपचार करतात ते योग्य नाही. मला कफ झाला तेव्हा मी आयुर्वेद डाक्टरकडं उपचार केले आणि मला फायदा झाला.
लोकांना आराम मिळणे, हा महत्वाचा विषय आहे. संस्कृत आणि आयुर्वेद याला जर्मनीत मोठं महत्व आहे. जगालासुद्धा आमच्या आयुर्वेदाला महत्त्व आहे. आम्हाला विश्वगुरु व्हायचं आहे. त्यासाठी ज्ञान महत्त्वाचं आहे. ते ज्ञान कुठून घ्यायचं ते ज्याला त्याला ठरवायचं आहे. त्यासाठी अभ्यास फार महत्त्वाचं आहे.
रिसर्च मोठ्या प्रमाणात होतात. मात्र ते सिक्रेट ठेवलं का जात माहीत नाही. त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. मी लघु व सुक्ष्म विभागाचा मंत्री होतो. तेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर विशाखापट्टणममध्ये बनविले. त्याचा वापर कोरोना काळात झाला. रामदेवबाबा यांनी आयुर्वेदच्या माध्यमातून जगातील मोठ्या कंपन्यांचा बँड वाजविला आहे. यावरून दिसून येत आपलं आयुर्वेद किती महत्वाचं आहे.
मुंबई-पुणे बांद्रा सिलिंक आणि इतर पुलांसाठी पैशाची गरज होती. मात्र स्टोक एक्स्चेंजमधून तेवढे पैसे मिळाले नाही. मात्र आम्ही ते उभे केले. आता आपण फॉरेनमधील पैसे घेण्यापेक्षा आपल्या देशातील घ्यायचा आता पैशाची कमी नाही, हे मी नियमित ठामपणे सांगत असतो.
आयुर्वेद रुग्णालयांची संख्या वाढत आहे. मात्र त्यात उपचार करणारे ज्ञानी डॉक्टरसुद्धा असायला पाहिजे, असंही गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. राजकारणात चमकेश्वर खूप असतात. पण तुमच्या कामात ते असायला नको तिथे. व्हिजन आणि रिझल्टचं पाहिजे.
माझे मित्र जयंत हे अभ्यासात हुशार होते. मात्र मी वेगळ्याच कामात असायचो. मी विद्यार्थी सेनेचे काम करत होतो. मला आतापर्यंत 3 डॉक्टरेट मिळाले आणि पुन्हा मिळणार आहे. मात्र मी डॉक्टर शब्द लावायला थोडं मागे असतो, असंही गडकरी म्हणाले.