Dr. Vasant Khadatkar | डॉ. वसंत खडतकर बाल मज्जाविकार राष्ट्रीय संस्थेच्या अध्यक्षपदी; नागपुरातील बालरोगतज्ज्ञांची पहिल्यांदा वर्णी
नॅशनल पेडियाट्रिक न्यूरोलॉजी चॅप्टर ही संघटना भारतीय बालरोग अकादमीचा उपविभाग आहे. बालरोग तज्ज्ञांची जगातील दुसरी सर्वात मोठी संघटना आहे. संघटना बाल आरोग्य, बालरोगतज्ज्ञांच्या स्वत:च्या समस्या आणि बाल आरोग्याशी संबंधित विविध धोरणे लागू करण्यासाठी सरकारला सल्ला देते.
नागपूर : प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खडतकर यांची बाल मज्जाविकार राष्ट्रीय संस्थेच्या (National Institute) अध्यक्षपदी निवड झाली आहे. नागपुरातील बालरोगतज्ज्ञांची पहिल्यांदा वर्णी लागली आहे. पहिल्यांदाच नागपुरातील बालरोगतज्ज्ञाची या पदावर वर्णी लागली आहे. तीस हजार सदस्य असलेली बालरोगतज्ज्ञांची ही जगातील दुसरी सर्वात मोठी संघटना आहे. डॉ. खडतकर यांच्या नेतृत्त्वात नागपुरात लहान मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची (Covacin Vaccine) चाचणी झाली होती. डॉ. खडतकर बत्तीस वर्षांपासून बालरोगतज्ज्ञ म्हणून रुग्णसेवा करत आहेत. राष्ट्रीय बालरोग मज्जाविकार उपशाखा (न्यूरोलॉजी चॅप्टर) कार्यकारिणीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ही निवड झाली आहे. ते 2022 आणि 2023 या वर्षासाठी अध्यक्ष असतील. डॉ. खळतकर हे या चॅप्टरच्या स्थापनेपासूनचे एकवीसावे अध्यक्ष असतील. नॅशनल पेडियाट्रिक न्यूरोलॉजी चॅप्टरच्या (National Pediatric Neurology Chapter) झालेल्या निवडणुकीतून डॉ. खळतकर यांची निवड झाली आहे.
न्यूरोलॉजिकल समस्यांच्या क्षेत्रात काम
ही संघटना भारतीय बालरोग अकादमीचा उपविभाग आहे. बालरोग तज्ज्ञांची जगातील दुसरी सर्वात मोठी संघटना आहे. संघटना बाल आरोग्य, बालरोगतज्ज्ञांच्या स्वत:च्या समस्या आणि बाल आरोग्याशी संबंधित विविध धोरणे लागू करण्यासाठी सरकारला सल्ला देते. न्यूरोलॉजी चॅप्टर अपस्मार, ऑटिझम, मेंदूचा संसर्ग, वर्तणुकीशी संबंधित समस्या आणि मेंदूशी संबंधित अनेक आजारांसारख्या मुलांच्या न्यूरोलॉजिकल समस्यांच्या क्षेत्रात ही संघटना काम करते. डॉ. खडतकर यांचे बाल आरोग्यासाठी कार्य पाहता इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सने 2010 मध्ये त्यांना भारतीय शैक्षणिक बालरोगशास्त्राची फेलोशिप देण्यात आली होती.
संघटनेचे सल्लागार
या संघटनेचे सल्लागार म्हणून ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, डॉ. विनित वानखडे, सहसचिव यवतमाळचे डॉ. एस. एल. जोशी, सचिव डॉ. सावंत, उपाध्यक्ष डॉ. कल्पना दत्ता आहेत. तर सदस्य म्हणून मुंबईच्या डॉ. शिल्पा कुलकर्णी, नागपूरचे डॉ. अमरजीत वाघ, तिरुअनंतपूरमचे डॉ. बेनेट, श्रीनगरचे डॉ. खुश्रीद वाणी, हैद्राबादचे डॉ. उटगे, बंगरुळूचे डॉ. रविशंकर, कोलकाताचे डॉ. अरिजित चटोपाध्याय आणि भुवनेश्वरचे डॉ. सश्मिता यांचा समावेश आहे.