Nagpur Election | प्रशासकीय राजवटीमुळं माजी नगरसेवकांच्या अडचणीत वाढ, निवडणूक खर्च वाढणार

नागपूर मनपा निवडणूक आता चार-पाच महिने निवडणुका पुढं ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं खर्चाचे बजेट वाढणार आहे. हा खर्च वाढल्यास उभेच्छुकांचे निवडणुकीचे गणित बिघडणार आहे. एकंदरित उभेच्छुकांच्या अडचणीत वाढ होत आहे.

Nagpur Election | प्रशासकीय राजवटीमुळं माजी नगरसेवकांच्या अडचणीत वाढ, निवडणूक खर्च वाढणार
नागपूर महापालिकाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 6:00 AM

नागपूर : पाच मार्चपासून नागपूर मनपात प्रशासक (Administrator) बसलेत. मनपा आयुक्तांकडं ( Municipal Commissioner) प्रशासकपद आहे. कार्यकाळ संपल्यानं नगरेसवक हे माजी झालेत. तरीही काही नागरिक नगरसेवकांकडं जातात. अशावेळी नगरसेवक (Corporator) संबंधित यंत्रणेला निर्देश देण्याचा प्रयत्न करतात. पण, आता ही यंत्रणा माजी झालेल्या नगरसेवकांना काही जुमानताना दिसत नाही. कारण आता नगरसेवकांचे अधिकार संपुष्ठात आलेत. ते माजी नगरेसवक झालेत. गडरलाईन तुंबल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारी नगरसेवकांकडं आधी केल्यास त्या समस्या दूर होत होत्या. नगरसेवक संबंधित यंत्रणेला आदेश देत होते. पण, आता परिस्थिती बदलली आहे. मॅनपावर कमी असल्याचं कारण देत माजी झालेल्या नगरसेवकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते. कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचा धाक राहिला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात काही भागात टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतो. पण, नगरसेवकांना अधिकार नसल्यानं आता सरळ कर्मचाऱ्यांच्या भरोशावर राहावे लागत आहे.

नगरसेवकांच्या कार्यालयातील गर्दी ओसरली

आधी नगरसेवकांच्या कार्यालयात चौक्या बसत होत्या. कुणी आल्यास त्यांच्या तक्रारींचे निवारण केले जात होते. आता या तक्रारींना कर्मचारी भिक घालताना दिसत आहेत. माजी झालेल्या नगरसेवकांना जुमानत नाहीत. कामेच होत नसल्यानं नगरसेवकांकडं जाण्याचा ओघ कमी झाला आहे.

खर्चाचे बजेट वाढणार

एप्रिलमध्ये निवडणुका होतील, या आशेने नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांनी खर्च करणे सुरू केले होते. कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचे काम सुरू होते. पण, आता चार-पाच महिने निवडणुका पुढं ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं खर्चाचे बजेट वाढणार आहे. हा खर्च वाढल्यास उभेच्छुकांचे निवडणुकीचे गणित बिघडणार आहे. एकंदरित उभेच्छुकांच्या अडचणीत वाढ होत आहे.

Video leaders’ reel funda | सोशल मीडियावर राजकीय रिलची चर्चा; फडणवीस, अजित दादा, मुख्यमंत्र्यांचेही रिल

Gondia help | घरी मुलीचं लग्न होतं, आगीत संपूर्ण वस्तू जळाल्या; अधिकारी-लोकप्रतिनिधींनी कुटुंबाला सावरलं

Devendra Fadnavis on Satish Uke arrest: कायद्याने जे व्हायचं तेच होईल, उके यांच्या अटकेनंतर फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.