Nagpur Tourism | आदासा तिर्थक्षेत्राच्या विकासामुळे रोजगाराच्या संधी, पर्यटकांसाठी ॲडव्हेंचर पार्कची सुविधा

या क्षेत्रात भव्य कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार आहे. त्या आतील भागात खेळाचे पार्क व बाहेरील भागात फुटबॉल हॉर्स रायडिंग, 55 हेक्टर जमिनीवर वन्यजीवांकरिता राखीव ठेवण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी विविध प्रकारचे वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे मनीष भारद्वाज यांनी सांगितले.

Nagpur Tourism | आदासा तिर्थक्षेत्राच्या विकासामुळे रोजगाराच्या संधी, पर्यटकांसाठी ॲडव्हेंचर पार्कची सुविधा
आदासा तिर्थक्षेत्राच्या विकासामुळे रोजगाराच्या संधीImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 8:35 AM

नागपूर : श्री. क्षेत्र आदासा हे तिर्थक्षेत्र भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यांना सर्व सोयीसुविधा मिळण्याच्या दृष्टीने तिर्थक्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे. त्याबरोबरच पर्यटनासाठी हे क्षेत्र महत्वाचे असल्याने येथे ॲडव्हेंचर पार्कची (Adventure Park) निर्मिती करण्यात येणार आहे. विविध खेळाच्या पार्क निर्मितीतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी व्यक्त केली. श्री. क्षेत्र अदासा येथील तिर्थक्षेत्र विकासाबाबत सादरीकरण द विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन येथील कार्यालयात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सहाय्यक वनसंरक्षक श्री. पालवे, एनएमआरडीएच्या अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये (Lina Upadhye), वास्तुविशारद श्री. भिवगडे तसेच सामाजिक वनीकरण विभाग व संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विविध प्रकल्पांची निर्मिती

केदार म्हणाले की, स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी या क्षेत्रात विविध प्रकारचे प्रकल्पाची निर्मिती करण्यात यावी. विविध प्रकारचे खाद्यानाचे स्टाल उभारणीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. विविध पर्यटन योजना राबविण्यात येणार आहेत. तसेच मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी येथे सांगितले. या तिर्थक्षेत्राच्या पर्यटन विषयक विकासासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामध्ये सर्व विकासकामे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. अतिरिक्त लागणार निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही श्री. केदार म्हणाले. या ठिकाणी आवश्यक सुविधांची त्याठिकाणी प्राधान्याने तजवीज करण्यात यावी. यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे ते म्हणाले.

फुटबॉल हॉर्स रायडिंग

मनीष भारद्वाज यांनी सादरीकरणाद्वारे क्षेत्राचा पर्यटन विषयक आराखडयाबद्दल अवगत केले. या क्षेत्रात भव्य कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार आहे. त्या आतील भागात खेळाचे पार्क व बाहेरील भागात फुटबॉल हॉर्स रायडिंग, 55 हेक्टर जमिनीवर वन्यजीवांकरिता राखीव ठेवण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी विविध प्रकारचे वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. विविध प्रकारचे खाद्यानाचे स्टाल, पेंचमध्ये सौर उर्जेवर चालणारी नाव आहे. त्याच धर्तीवर येथेही तयार करण्याचे ठरविले आहे. स्काय सायकल, मल्लखांब व जिम्नॉस्टिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पेटी झु, एरो स्पोर्ट प्रामुख्याने परदेशात प्रसिध्द आहे ते सुध्दा येथे आणण्याचा प्रयत्न आहे. या आराखाड्यानुसार विकासात्मक योजना राबविल्या तर निश्चितच भाविक व पर्यटकांना हे तिर्थक्षेत्र भावेल, असे त्यांनी सांगितले.

Devendra Bhuyar | डॉक्टर अनिल बोंडे 3-4 वाजतानंतर शुद्धीवर नसतात; अमरावतीत देवेंद्र भुयार यांची खोचट टीका

Amravati NCP | राष्ट्रवादीचा उद्या अमरावतीत मेळावा, शरद पवार उपस्थित राहणार, देवेंद्र भुयार राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Video Nagpur Police | आमदार आशिष जैसवाल यांचे पोलिसांवर गंभीर आरोप; वाहतूक पोलिसांना सुनावले

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.