Nagpur Crime | आधी दुचाकी चोरी, चोरीच्या गाडीने फिरून घरफोडी; नागपूर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
घरफोडीच्या प्रकरणात दोघांनाही पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतल होतं. हे दोन्ही चोर मोठे शातीर होते. ते आधी बाईक चोरी करायचे. त्यासाठी ते बनावट चाबीचा वापर करायचे. त्याचं दुचाकीचा वापर चोरीसाठी करायचे. ती बाईक घेऊन घरफोडी करायला जायचे.
नागपूर : नागपुरातील दोन शक्कलबाज चोरांना पोलिसांनी कैद केलंय. घर फोडी करण्याच्या आधी बाईकची चोरी आणि चोरीच्या गाडीने घरफोडी अश्या पद्धतींची कार्यपद्धतीचं या चोरांनी अवलंबली होती. शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या (various police stations in the city) हद्दीतून बनावट चावीच्या माध्यमातून दुचाकी चोरी करायचे. त्या दुचाकीचा वापर घरफोडीसाठी केला जायचा. मात्र पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. कपिल गवारे आणि स्वप्निल लोजवे अशी दोन्ही आरोपींची नाव आहेत. एका घरफोडीच्या प्रकरणात (burglary cases) दोघांनाही पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतल होतं. तपासादरम्यान पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ज्यात मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल आणि 5 गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. नागपूर क्राईम ब्रांच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. यात आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत (Police Inspector Vitthal Singh Rajput) यांनी दिली.
अशी करायचे चोरी
घरफोडीच्या प्रकरणात दोघांनाही पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतल होतं. हे दोन्ही चोर मोठे शातीर होते. ते आधी बाईक चोरी करायचे. त्यासाठी ते बनावट चाबीचा वापर करायचे. त्याचं दुचाकीचा वापर चोरीसाठी करायचे. ती बाईक घेऊन घरफोडी करायला जायचे. बाईक दुसऱ्याचीच असल्यानं यांचा पत्ता लागत नव्हता. सुरुवातील संशयिच म्हणून ते पोलिसांच्या हाती लागले. पण, पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हे कबुल केले.
पाच गाड्या पोलिसांनी केल्या जप्त
कपिल गवारे आणि स्वप्निल लोजवे अशी चोरट्यांची नावं आहेत. या दोन्ही चोरट्यांकडून पोलिसांनी आतापर्यंत पाच गाड्या आणि चोरी केलेला माल जप्त केला आहे. आणखी काही ठिकाणी त्यांनी डल्ला मारल्याची शक्यता आहे. याचा तपास आता पोलीस करत आहेत.