नागपुरात या कार्यालयावर ईडीचा छापा, तब्बल ११ तास अधिकाऱ्यांनी घेतली झाडाझडती
चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचं कार्यालय सदर परिसरात आहे. या मिशनतर्फे शाळांमध्ये शुल्क आकारलं जातं. त्या शुल्कात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
नागपूर : नागपुरात सदर भागात चर्चच्या कार्यालयावर ईडीचा छापा मारण्यात आला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीची छापेमारी केली. देशभर चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या ११ कार्यालयावर छापे टाकण्यात आले. नागपुरात ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल दहा तास कार्यालयाची झाडाझडती केली. नागपूरच्या धाडीत महत्त्वपूर्ण कागदपत्र ईडीच्या हाती लागल्याची माहिती आहे. बिशप पी सी. सिंह यांनी मिशनतर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील शुल्काचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचं हे कार्यालय सदर परिसरात आहे. या मिशनतर्फे शाळांमध्ये शुल्क आकारलं जातं. त्या शुल्कात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
बिशप पी. सी. सिंह हे त्यांच्या कार्यकाळात वादग्रस्त ठरले आहेत. चर्च ऑफ नॉर्थ इंडिया अंतर्गत अनेक गैरप्रकार असल्याची माहिती आहे. संस्थेच्या जमिनी आणि इतर आर्थिक गोष्टींतही गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बिशप सिंह याला नागपूर विमानतळाहून अटक करण्यात आली होती. ही अटक मध्यप्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीनं करण्यात आली. ईडीने फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
महत्त्वाची कागदपत्र जप्त
ईडीने देशभरात ११ ठिकाणी छापेमारी केली. त्यापैकी नागपूर येथील चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या या कार्यालयाचा समावेश आहे. बुधवारी ईडीने ही छापेमारी केली. तब्बल ११ तास अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. सदर भागातील या कार्यालयातील विविध कागदपत्र तपासण्यात आली. काही महत्त्वाची कागदपत्र ईडीने जप्त केल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.
काय आहे आरोप
मध्य प्रदेश पोलिसांना बिशपच्या घरी सुमारे १ कोटी ६० लाख रुपये सापडले होते. सिंह त्यावेळी जर्मनीत गेले होते. शैक्षणिक सोसायटीत गैरव्यवहार करून हा पैसा जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २००४-०५ आणि २०११-१२ मध्ये विविध सोसायट्यामधील विद्यार्थ्यांचे शुल्क जमा झाले. तेथील २ कोटींपेक्षा जास्त रक्कम धार्मिक ठिकाणांमध्ये स्थानांतरित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.