Video Samrudhi Highway | समृद्धी महामार्गाची एकनाथ शिंदे आज पाहणी करणार, 2 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील पहिला टप्पा नागपूर ते सेलू बाजार या 210 किलोमीटर अतंराच्या महामार्गाचं येत्या 2 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
नागपूर : येत्या 2 मे रोजी लोकार्पण होणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्याची अंतीम पहाणी आज MSRDC मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) करणार आहेत. समृद्धी महामार्गावरील पहिला टप्पा नागपूर ते सेलू बाजार असा 210 किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सज्ज आहे. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ज्या महामार्गाची ओळख बनलीय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आता जनतेला सुपरफास्ट प्रवास करण्यासाठी खुला होणार आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या या महामार्गाचा पहिला टप्पा आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. समृद्धी महामार्गावरील पहिल्या टप्यातील 210 किमीचा महामार्ग जनतेला वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पहिला टप्पा नागपूर ते सेलू बाजार या 210 किलोमीटर अतंराच्या महामार्गाचं येत्या 2 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Thackeray) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
समृद्धी महामार्गाचे 2 मे रोजी लोकार्पण
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा आज अंतीम पहाणी दौरा MSRDC मंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील पहिला टप्पा नागपूर ते सेलू बाजार या 210 किलोमीटर अतंराच्या महामार्गाचं येत्या 2 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि MSRDC मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मुंबई ते नागपूर हा महामार्ग 710 किलोमीटरचा आहे. पूर्वी रस्त्यानं मुंबईला जायला 14 तास लागायचे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर 7 तासांत मुंबईला जाता येणाराय. म्हणजे प्रवास अर्ध्या वेळेत पूर्ण होणाराय.
दूध, भाजीपाला मुंबईला जाणार
विदर्भातील शेतकऱ्यांचा दूध, भाजीपाला मुंबईला कमीत-कमी वेळेत पोहचणार आहे. मुंबईची बाजारपेठ विदर्भवासीयांना कशी मिळेल, याचं नियोजन यातून करण्यात आलंय. औद्योगिक कॉरिडोर उघडण्यात येणार आहे. या महामार्गाची मूळ संकल्पना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती. वन्यप्राण्यांचीही काळजी घेण्यात आली आहे. सहापदरी महामार्गावर हा एकदम चकाचक आहे. या महामार्गावरून प्रतितास 120 किलोमीटर अंतर वाहनांना कापण्याची परवानगी देण्यात आली आहे. 710 किलोमीटरचा हा देशातील सर्वात मोठा महामार्ग आहे. जागतिक दर्जाचं काम झालंय. या महामार्गामुळं मागास विदर्भ हा देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडला जाणाराय.