“एकनाथ शिंदेच 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहतील”; मुख्यमंत्री पदाच्या वादावर या मंत्र्याने थेट पडदाच पाडला

केंद्राच्या मदतीने राज्यात सन्मान योजनाही करता आली. त्याच बरोबर या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी विभागाला झुकते माफ देऊन राज्यातील शेतकऱ्याला सुख समाधान देण्याचा प्रयत्न केला गेला असंही त्यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदेच 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहतील; मुख्यमंत्री पदाच्या वादावर या मंत्र्याने थेट पडदाच पाडला
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 8:52 PM

नागपूर : एकनाथ शिंदे ज्या दिवसांपासून मुख्यमंत्री पदावर आले आहेत, त्यादिवसांपासून राज्यातील जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील व्यक्ती मंत्री पदाच्या खुर्चीवर बसला आहे. त्यामुळे यापुढेही मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे हेच असायला पाहिजे असा विश्वास कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.एकीकडे राज्यात मुख्यमंत्री पदावरून बॅनरबाजी चालू असतानाच दुसरीकडे मात्र मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे हेच 2029 पर्यंत मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आखून त्यांची अंमलबजावणी करता आली. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर योग्य ती नुकसानभरपाईही शेतकऱ्यांना देण्यात आली असंही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री असल्यामुळेच राज्यातील जनसामान्यांना न्याय देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामुळे 2024 मधील निवडणुकीतही तेच मुख्यमंत्री राहिले पाहिजे कारण ते मुख्यमंत्री असतील तरच जनसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहेत.

त्याचबरोबर एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री राहिले तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला मंत्री पदाची अशी खुर्ची मिळते. शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या मदतीने राज्यात वेगवेगळ्या योजना आखता येतात असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, मी कृषीमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे एक रुपयामध्ये विमा योजना राबवण्यात आली.

केंद्राच्या मदतीने राज्यात सन्मान योजनाही करता आली. त्याच बरोबर या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी विभागाला झुकते माफ देऊन राज्यातील शेतकऱ्याला सुख समाधान देण्याचा प्रयत्न केला गेला असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.