आमचे आमदार वारले, मतदारसंघात न फिरकल्याने पोस्ट व्हायरल, आमदारांकडून पोलिसात तक्रार
कामठी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार टेकचंद सावरकर (BJP MLA Tekchand Sawarkar) हरविल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
नागपूर : नागपुरात कोरोनाचा उद्रेक होत असताना, (Nagpur Corona update) आमदार महाशय फिरकलेच नसल्याची तक्रार होत आहे. अशा परिस्थितीत नागपुरातील कामठी मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार टेकचंद सावरकर (BJP MLA Tekchand Sawarkar) हरविल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. इतकंच नाही तर संतापलेल्या काहींनी आमदार सावकर हे कोरोनामुळे वारले असंही लिहून पोस्ट व्हायरल केली. या प्रकारामुळे संतापलेल्या आमदार टेकचंद सावरकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. (Fake post viral on social media about BJP MLA Tekchand Sawarkar after he not seen in Kamthi constituency corona)
काय आहे प्रकरण?
नागपुरात कोरोनाचं थैमान आहे. मात्र कामठी मतदारसंघातील भाजप आमदार टेकचंद सावरकर हे मतदारसंघात फिरकलेच नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे आमदार महोदय हरवल्याची पोस्ट, सोशल मीडियावर फिरत आहे. एव्हढंच काय तर संकटाच्यावेळी आमदार महोदयांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत, संतापलेल्या एका मतदाराने, आमदार सावरकर यांचं कोव्हिडमुळे निधन झाल्याची पोस्टही व्हायरल केली.
आमदारांची पोलिसात तक्रार
या संदर्भात आमदार टेकचंद सावरकर यांनी शहरातील वाठोडा पोलीस स्थानकात जाऊन पोस्ट व्हायरल करणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
कोरोना काळात आमदार मतदारसंघात फिरत नसल्याने नाराज मतदारांनी अनेक पोस्ट व्हायरल केल्या आहेत. नागपूरमध्ये कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस गडद होत असल्याने सर्वसामान्य कोरोनाबाधित नागरिकांचे हाल होत आहेत. कोणत्याही स्तरावरून मदत मिळत नसल्याने आता नागरिकांमध्ये संताप निर्माण होऊ लागला आहे.
आमदार टेकचंद सावरकर हे नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. कोरोनाची परिस्थिती बिकट झाल्यापासून टेकचंद सावरकर मतदारसंघात फिरलेच नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे अनेकांनी ते हरवल्याची पोस्ट केली तर काहींनी श्रद्धांजलीचाकार्यक्रम देखील आटोपला. यामुळे संतापलेल्या आमदारांनी शहरातील वाठोडा पोलीस स्थानकात जाऊन पोस्ट व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. सोशल मीडियावर आपली बदनामी केली जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.
संबंधित बातम्या
ऑक्सिजन मास्क फेकून देत कोरोनाग्रस्ताचे पलायन, रुग्ण अजूनही बेपत्ता; नागपुरातील धक्कादायक प्रकार
देवेंद्र फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, काँग्रेसचा सवाल