Nagpur suicide | थडीपवनीतील शेतकऱ्याची आत्महत्या; का घ्यावी लागली विहिरीत उडी?
शेतकऱ्याने शेतीसाठी खासगी कर्ज घेतले होते. खासगी कर्जदार पैशासाठी तकादा लावत होता. त्यामुळं वसंत यांनी हे टोकाचे पाऊल उचल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपूर : नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथील शेतकऱ्याने शनिवारी सकाळी विहिरीत उडी (jump into the well) मारून आत्महत्या (Farmer Suicide) केली. वसंत शामराव मातकर (वय 48) असं मृतकाचं नाव आहे. वसंत मातकर यांनी दोन वर्षापूर्वी शेती विकली. आलेल्या पैशातून कर्ज फेडले. तसेच शिल्लक असलेल्या पैशातून दोन एकर शेती विकत घेतली. घेतलेल्या शेतीचे पैसे द्यायचे होते. पैश्यांची अडचण भासत होती. शिवाय सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. त्यामुळं शेतीची रजिस्ट्री करायची कशी? पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. आधीच शेती विकली होती. उपजीविका करण्यासाठी दुसरी शेती खरेदी करणे आवश्यक होते. 20 जानेवारीला शेतीची रजिस्ट्री होती. 10 लाख रुपयांमध्ये दोन एकर शेती विकत घेतली होती. 6 लाख रुपये दिले होते. शिल्लक 4 लाख रुपये देणे बाकी होते.
शेतातील विहिरीत सापडला मृतदेह
वसंत मातकर शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता घरून बाहेर पडले. रात्री 8 वाजले तरी ते परत घरी आले नाही. त्यामुळं घरच्यांना चिंता वाटू लागली. वसंत यांचा शोध घेणे सुरू केले. त्यांचा सर्वत्र शोध घेतला. परंतु ते सापडले नाही. शनिवारी 8 च्या सुमारास शेतातील विहिरी जवळ टावेल दिसले. विहिरीत पाहले असता वसंत यांचा मृतदेह आढळला.
कर्जदार लावत होते पैशांसाठी तगादा
वसंत यांच्याकडे चार लाख रुपयांची जुळवाजुळव होत नव्हती. इतरांना दिलेले पैसे परत मिळत नव्हते. शेतातील पीक पावसामुळे खराब झाले होते. वसंत यांनी शनिवारी सकाळी स्वतःच्या शेतातीमाल विहीरीत उडी मारली. शेतकऱ्याने शेतीसाठी खासगी कर्ज घेतले होते. खासगी कर्जदार पैशासाठी तकादा लावत होता. त्यामुळं वसंत यांनी हे टोकाचे पाऊल उचल्याचे सांगण्यात येत आहे.