Nagpur corona | नागपुरात कोरोनाची भीती, सक्रिय रुग्णांची संख्या 210, शंभर दिवसांनंतर वाढली रुग्णसंख्या

लक्षणे असलेल्या 5 रुग्णांपैकी 3 जण मेडिकलमध्ये तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मागील तीन दिवसांच्या तुलनेत सोमवार, 13 जून रोजी जिल्ह्यात चाचण्यांचीही संख्या घटल्याचे पहायला मिळाले. सोमवारला जिल्ह्यात 1 हजार 855 इतक्याच चाचण्या करण्यात आल्या.

Nagpur corona | नागपुरात कोरोनाची भीती, सक्रिय रुग्णांची संख्या 210, शंभर दिवसांनंतर वाढली रुग्णसंख्या
नागपूर जिल्ह्यात 210 जण कोरोना पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 12:29 PM

नागपूर : देशात आणि राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नागपूर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रकोप दिसून येत आहे. आठवड्याभरापूर्वीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या फक्त 20 होती. गेल्या आठ दिवसांत ही सक्रिय असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 210 झाली. दैनंदिन बाधित वाढत आहेत. कोरोना मुक्त होण्याचं प्रमाण घटलंय. यामुळं प्रशासन (Administration) चिंतेत पडलंय. जिल्ह्यात जवळपास शंभर दिवसांनंतर सक्रिय रुग्णसंख्येने दोनशेचा आकडा ओलांडला आहे. आता लक्षणे असलेले रुग्णही आढळून येत आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये (hospital) उपचार सुरू आहेत. दिवसाआड ही रुग्णसंख्या वाढत आहे. बाधितांची संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आलंय. यासोबतच चाचण्यांची (tests) संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे.

1 हजार 855 चाचण्या

जिल्ह्यात 3 मार्च 2022 नंतर सोमवार, 13 जून रोजी 101 दिवसानंतर सक्रिय रुग्णसंख्या 210 वर पोहोचली. यात ग्रामीणमधील 67, शहरातील 141 आणि जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी 205 जणांना कुठलेही लक्षणे नाहीत. ते गृहविलगीकरणात आहेत. लक्षणे असलेल्या 5 रुग्णांपैकी 3 जण मेडिकलमध्ये तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मागील तीन दिवसांच्या तुलनेत सोमवार, 13 जून रोजी जिल्ह्यात चाचण्यांचीही संख्या घटल्याचे पहायला मिळाले. सोमवारला जिल्ह्यात 1 हजार 855 इतक्याच चाचण्या करण्यात आल्या.

चाचण्यांचे प्रमाण वाढविले

विमानाने आणि रेल्वेने बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यासाठी महापालिका विमानतळावर आपले कर्मचारी ठेवले. प्रवास करून आलेल्यांची लिस्ट घेऊन कर्मचारी त्यांच्या घरी सुद्धा पोहोचतात. मॉल, बाजारपेठा या ठिकाणी सुद्धा पोलिसांच्या मदतीने भरारी पथक स्थापन करण्यात आले. टेस्टिंग हा सर्वात महत्वाचा घटक आहे. नागरिकांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. असे आवाहन नागपूर पालिका प्रशासनानं केले आहे.

हे सुद्धा वाचा

रुग्णालयातही टेस्ट

रुग्णालयात तपासण्यासाठी गेलेल्या रुग्णांची कोरोना टेस्ट घेतली जात आहे. पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन कंबर कसून कामाला लागले आहे. बऱ्याच रुग्णांना लक्षण नसल्यानं त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आलंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.