Mohan Bhagwat : अखंड भारतासाठी घाबरून चालणार नाही, उतिष्ठ भारत व्याख्यानात नेमकं काय म्हणाले, डॉ. मोहन भागवत…
जे इतिहासकार भारत तीन हजार वर्षे जुना सांगतात ते अपडेट नाहीत. भारत नऊ हजार वर्षे जुना आहे. पण हे आपल्या अभ्यासक्रमात नाही. पाठ्यक्रम बदलून हे सगळ सांगावं लागेल.
नागपूर : अखंड भारताचं स्वप्न पाहायचं आहे तर तुम्हाला भिऊन चालणार नाही. भिन बंद करा. अखंड भारत दिसेल. भारताला शक्ती मिळाली त्या शक्तीचा वापर भारताने विश्वाला मार्गदर्शन (Guidance) करण्यासाठी केला. त्यांना मदत करण्यासाठी केली. भारताचा स्वभाव अहिंसावादी आहे. भारताला मोठं करायचं आहे तर भारताचे सगळे संप्रदाय एक आहे. सगळ्या भाषा माझ्या आहेत. राष्ट्रभाषा (National Language) सगळ्या भाषा आहे, असं मत आपण करायला पाहिजे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. ते उतिष्ठ भारत व्याख्यान (Utishtha Bharat Lecture) कार्यक्रमात नागपुरात बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, जोश तरुणाईच नाव आहे. मात्र त्यासोबत होश सुद्धा पाहिजे. दिशा पाहिजे. विचार पाहिजे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले. मात्र 2047 मध्ये भारत कसा असेल यावर विचार करावा लागेल. त्यासाठी काम करावं लागेल. वंदे मातरमचे नारे त्या काळात लागले. तेव्हा काळ्या पाण्याची सजा भोगावी लागली. अनेकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आम्ही ठरविलेल्या धैयापर्यंत पोहचण्यासाठी सामर्थ्य शक्ती निर्माण करावी लागेल. भारताला महाशक्ती बनवायचं आहे. त्यासाठी काम करावं लागणार आहे. अमेरिका महाशक्ती आहे. चीन महाशक्ती आहे. मात्र आपल्याला तशी महाशक्ती बनायचं आहे का? भारत एक विचार आहे. सगळ्यांना घेऊन चालणारा आहे. ज्ञान देणारा ठरला पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल
मोहन भागवत म्हणाले, कोरोना महामारी आली. त्यात सगळे पंगू झाले. मात्र भारत त्यात टिकून राहिला. सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं हे जर जगाला शिकायचं असेल तर ते भारताकडे बघतात. ती शक्ती आपली आहे. आपल्या संविधानात नागिरकांचं कर्तव्य काय हे स्पष्ट आहे. सगळ्या विविधतेचा एकत्रित बांधून घेऊन चालणार सगळ्यांना घेऊन चालणार कोणालाही न संपविणार भारत आज घडला आहे. भारताची वास्तविकता आम्हाला शोधावी लागेल. आम्ही जातीपातीच्या भिंती बांधल्या आणि त्याला धर्म मानायला लागले. त्यातून अहंकार निर्माण झाला. धर्माच्या नावावर हानी झाली. यामागचं करण आपल्याला जाणून घ्यावे लागले, असा सल्ला त्यांनी दिला.
भारताचा इतिहास 9 हजार वर्षे जुना
मोहन भागवत यांनी सांगितलं की, सीमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा प्रतिकार आम्ही केला आहे. आमचा इतिहास मृत्यूंजय आहे. तो आम्हाला जाणून घ्यावा लागेल. स्वातंत्र्यासाठी मोठे बलिदान झाले. अनेकांना फाशी झाली. अनेकांनी देशासाठी संशोधन केले. भारत तीन हजार वर्षे सतत सर्वोच्च स्थानी राहिला. त्यांनी कोणावर आक्रमण केलं नाही. तो वैभवशाली भारत पुन्हा एकदा पाहायचा आहे. जे इतिहासकार भारत तीन हजार वर्षे जुना सांगतात ते अपडेट नाहीत. भारत नऊ हजार वर्षे जुना आहे. पण हे आपल्या अभ्यासक्रमात नाही. पाठ्यक्रम बदलून हे सगळ सांगावं लागेल. भारताच्या वास्तविकतेला जाणून घ्यावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं.