OBC Finance | ओबीसींच्या विकासासाठी वित्त पुरवठा; जाणून घ्या स्वयंरोजगारासाठीच्या योजना

20 टक्के भांडवल महामंडळाकडून तर उर्वरित 75 टक्के बँकेच्या कर्जातून (75 percent bank loans) असे या योजनेच्या वित्तपुरवठ्याचे स्वरूप आहे. महामंडळाच्या सहभागावर केवळ 6 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. परतफेडीचा कालावधी 5 वर्षांचा असेल.

OBC Finance | ओबीसींच्या विकासासाठी वित्त पुरवठा; जाणून घ्या स्वयंरोजगारासाठीच्या योजना
नागपुरातील सामाजिक न्याय भवन
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 7:07 AM

नागपूर : राज्याच्या इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने (Other Backward Classes Finance and Development Corporation) इतर मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकास व स्वयंरोजगारासाठी वित्त पुरवठ्याच्या महत्वाकांक्षी दोन योजना जाहीर केल्या आहेत. होतकरुंना व्यवसायासाठी भांडवल पुरवणे (Providing capital for business) हे या योजनांचे उद्दिष्ट आहे. 20% बीज भांडवल कर्ज योजनेत ओबीसी प्रवर्गातील पात्र व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी 5 लाखांपर्यंतचे कर्ज दिल्या जाईल. कोणत्याही राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेता येईल. लाभार्थ्याचे स्वतःचे 5 टक्के भांडवल अनिवार्य आहे व त्याचे कौंटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे. 20 टक्के भांडवल महामंडळाकडून तर उर्वरित 75 टक्के बँकेच्या कर्जातून (75 percent bank loans) असे या योजनेच्या वित्तपुरवठ्याचे स्वरूप आहे. महामंडळाच्या सहभागावर केवळ 6 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. परतफेडीचा कालावधी 5 वर्षांचा असेल.

1 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज

थेट कर्ज योजनेत 1 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज निरंक स्वहिस्सा तत्वावर देण्यात येईल. म्हणजेच स्वतःची काहीच गुंतवणूक न करता सुद्धा छोटी रक्कम महामंडळ या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देईल. या रकमेची परतफेड 2085 रुपयांच्या समान मासिक हप्त्यांमध्ये 4 वर्षांच्या कालावधीत करावयाची असल्याने ही योजना गरिबातल्या गरीब उपयोगी ठरेल. ओबीसी वर्गातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे.

येथे साधा संपर्क

या कल्याणकारी योजनांची संपूर्ण माहिती व लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या नागपूर कार्यालयास संपर्क करावा. बी विंग 303, तिसरा मजला. डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रहाटे कॉलोनी, शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या समोर, श्रद्धानंद पेठ, नागपूर असा कार्यालयाचा पत्ता आहे. 0712-2225881 या दूरध्वनीवर अथवा dmobcnagpur@gmail.com या मेल आय डी वर संपर्क करता येईल.

‘Why I Killed Gandhi’ चित्रपटात अमोल कोल्हेंनी साकारली नथुराम गोडसेची भूमिका, आता आळंदीत आत्मक्लेश!

सावधान! लग्न होऊन कितीही वर्षे झाली तरी, होऊ शकतो घटस्फोट, का ते वाचा

नथुराम गोडसेची भूमिका साकारणाऱ्या खासदार अमोल कोल्हेंचा आळंदीत आत्मक्लेश!

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.