‘ढिगभर गद्दार असण्यापेक्षा मुठभर निष्ठावंत असेली की लढाई सहज जिंकतो’; उद्धव ठाकरे नागपुरात सभा घेऊन दणका दाखवणार…
खोटी मुकवटाधारी माणसं निघून गेली आहेत आणि सैनिक वृत्तीची माणसं आपल्यासोबत राहिली असल्याचं सांगत त्यांनी शिवसैनिकांसाठी गौरवोद्गगारही काढले आहेत.
नागपूरः हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीका करताना त्यांनी गद्दार म्हणत जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, ढिगभर गद्दार असण्यापेक्षा मुठभर निष्ठावंत असली की लढाई सहज जिंकता येते असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी ज्या ज्या आमदारांनी बंडखोरी केली, त्यांची ही कारस्थानं आपल्याला माहिती होती असं सांगत. जी मनानं विकली गेलेली माणसं आहेत ती माझ्या संग्रहामध्ये ठेवूच कशाला असा सवालही त्यानी शिवसैनिकांना केला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्याकडची एक भाकर दुसऱ्याला देणं ही आपली संस्कृती आहे पण आहे ती दुसऱ्याकडची भाकरीही हिसकावून घेण ही संस्कृती नाही तर ती विकृती आहे असा टोला त्यांनी शिंदे गटाला आणि भाजपला लगावला आहे.
यावेळी त्यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांनवर टीका करताना गद्दार म्हणत त्यांनी सांगितले की, खोटी मुकवटाधारी माणसं निघून गेली आहेत आणि सैनिक वृत्तीची माणसं आपल्यासोबत राहिली असल्याचं सांगत त्यांनी शिवसैनिकांसाठी गौरवोद्गगारही काढले आहेत.
मनानं विकली गेलेली माणसं मी माझ्या संग्रहात कशाला ठेवू त्यामुळे मला माहिती असूनही त्यांना तर चालते व्हा असा सज्जड दमही त्यांनी भरला.
शिवसेनेतून सत्यासाठी, हिंदुत्वासाठी बंड केलं म्हणता, नरेंद्र मोदींचा वापर करून निवडणुका जिंकला असा आरोप करता मग बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो प्रचारासाठी का वापरता असा थेट सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.
गुजरात निवडणुकीतही तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ दाखवून तुम्ही प्रचारासाठी बाळासाहेबाच्या नावाचा वापर केला. जर तुमच्यात हिम्मत असेल तर फक्त नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडणूक लढवून दाखवा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी त्यांनी नागपूरातील कस्तुरचंदवर पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक सभा घेऊन शिवसेनेचा आवाज पुन्हा एकदा दाखवायचा आहे असा विश्वासही त्यानी यावेळी व्यक्त केला आहे.