मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देतो असं सांगून तब्बत 52 लाखांचा घातला गंडा…
मुलीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी तब्बल 52 लाख रुपये उखळले असल्याने या घटनेमुळे जोरदार खळबळ उडाली आहे.
नागपूरः मुलीला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देतो म्हणून तब्बल 52 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. त्यामुळे नागपूरसह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. तामिळनाडूच्या ठगांनी नागपूरच्या पालकाला हा गंडा घातला असून या प्रकरणी तामिळनाडूच्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झिंगाबाई टाकळी परिसरात राहणारे ओमप्रकाश वंदेवार असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर फिर्यादी हे सलुनचा व्यवसाय करत असून त्यांच्या मुलीने नीटच्या परीक्षेमध्ये यश मिळवले होते.
मात्र वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी लागणारे गुण कमी असल्याने त्यांना सरकारी कोट्यातून जागा मिळणार नाही हे पक्के झाल्यानंतर विद्यार्थिनीचे वडील आपल्या मुली्च्या प्रवेशासाठी ते प्रयत्नात होते.
मात्र त्यांना तामीळनाडूच्या एका व्यक्तीचा नंबर मिळाल होता. त्यामुळे त्या व्यक्तिने तामिळनाडूच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे त्यांना आमिष दाखवण्यात आले होते.
त्यासाठी ओमप्रकाश यांच्याकडून तामिळनाडूच्या तिघांनी तब्बल 52 लाख रुपये घेतले होते मात्र पैसे देऊ नये प्रवेशही मिळाला नाही यामुळे अखेर नागपूरच्या मानकापूर पोलिसात तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
मुलीच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी तब्बल 52 लाख रुपये उखळले असल्याने या घटनेमुळे जोरदार खळबळ उडाली आहे.
तामीळनाडूमधील तिघांनी प्रवेश मिळवून देतो असं सांगून पैसे लाटले होते मात्र पैसे देऊनही मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे सारे कुटुंब चिंताग्रस्त झाले होते. त्यानंतरही पैसे घेणाऱ्याना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र तरीही त्याकाळात त्यांचा संपर्क झाला नव्हता.
मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देतो असं सांगून पैसे लाटणाऱ्या तिघांविरोधात आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आता पोलीस नेमका कसा तपास करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.