Nagpur | बहिरेपणातून मिळाली मुक्ती! बाळाच्या आईचा आनंद मोठा, मेयोत श्रवणदिनानिमित्त कार्यक्रम
जगात सहा टक्के लोकं बहिरेपणाने त्रस्त आहेत. नागपुरातील मेयो रुग्णालयात काही बालकांवर उपचार करण्यात आले. त्यामुळं त्यांचा बहिरेपणा दूर झाला. याचा आनंद बालकांच्या आईच्या मनात दिसत होता. श्रवणदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
नागपूर : मातांना प्रसुतीमध्ये बाळ बहिरे असल्याचे कळते. अश्यावेळी योग्य उपचार आवश्यक असतात. त्यामुळे त्यांचे भावी जीवन अधंकारमय होऊ नये. यासाठी बालकांच्या मातांना उपचाराबाबत जागृत करणे आवश्यक आहे. बहिरेपणाबाबत जागरुक राहणे, प्रत्येक नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. याबाबत विस्तृत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर (Chief Executive Officer Yogesh Kumbhejkar) यांनी सांगितले. इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (Indira Gandhi Government Hospital) (मेयो) येथे काल जागतिक श्रवण दिनाचा (World Hearing Day) कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनावणे, अधीक्षक डॉ. लिना धांडे, नाक, कान व घसा विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी, डॉ. इएनटी आसोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नंदू कोळवटकर, विदर्भ अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. समीर ठाकरे, डॉ. मुंदडा, डॉ. आनंद सौदी, डॉ. समीर चौधरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर आदी यावेळी उपस्थित होते.
मूक, बधिर विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप
डॉ. वेदी यांनी आतापर्यंत 49 कॉकरेल इम्प्लांटमेंट केले आहे. 50 व्या इम्प्लांटमेंटची कार्यवाही झाली. ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये बहिरेपणा असल्यास लवकर लक्षात यावा. त्यांना अगदी कमी पैशात मुलावर लहानपणीच उपचार करता यावा. यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात यंत्रणा निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. कर्कश आवाजापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मूक व बधिर मुलांना शालेयोपयोगी वस्तुचे वितरण करण्यात आले. बालकांच्या पालकांना इम्प्लांटमेंट साहित्य सुपूर्द करण्यात आले. जागतिक श्रवण दिनानिमित्त पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धेकांना बक्षीस देण्यात आले.
दरहजारी 10 मुलांना आजार
डॉ. जीवन वेदी यांनी श्रवण दिनाची माहिती दिली. कानाचा आकार 3 सारखा असल्यामुळेच जागतिक श्रवण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेद्वारे भरपूर निधी नाक, कान व घसा विभागाला मिळाले. जगात 6.3 टक्के व्यक्ती बहिरेपणाने ग्रस्त आहेत. दरहजारी 10 मुलांना हा आजार आहे. त्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे डॉ. प्रशांत निखाडे यांनी सांगितले. नंदू काळवटकर यांनी मार्गदर्शन केले. जन्मजात बहिरेपण आलेल्या बालकांच्या मातेनी आपले मनोगत केले. शासकीय रुग्णालयामुळेच माझ्या बाळाला बहिरेपणापासून मुक्ती मिळाली. त्याचे जीवन सुकर झाले. त्याची श्रवणशक्ती जागृत झाल्याने जो आनंद मला झाला तो मोठा आहे, असं मत व्यक्त केले.