फ्रीडम टू वॉक अँड सायकल, सर्वाधिक नोंदणी करण्याचा मान नागपूरला, काय आहे ही मोहीम?
नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी (Smart and Sustainable City) डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नागरिकांना सायकल आणि पायी चालण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यासाठी एक ते सव्वीस जानेवारी या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. नागपूर स्मार्ट सिटीच्या महाव्यवस्थापक (प्रभारी) पर्यावरण विभाग, डॉ. प्रणीता उमरेडकर यांनी ही माहिती दिली.
नागपूर : केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी विकास मंत्रालयातर्फे (Ministry of Urban Development) इंटर-सिटी फ्रीडम टू वॉक अँड सायकल’ मोहीम आयोजित करण्यात आली. या अंतर्गत सर्वात जास्त कि.मी. चालणे आणि सायकलिंगसाठी सर्वाधिक नोंदणी करण्याचा मान नागपूर शहराला मिळाला आहे. शहरासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. यासाठी महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस यांनी सर्व नागपूरकर जनतेचे आभार मानले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (festival of freedom) नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व नागपूर महापालिकातर्फे नागरिकांनी या मोहिमेत भाग घ्यावा. जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन (Appeal to register) करण्यात आले होते.
महिनाभर राबविली मोहीम
केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या निर्देशानुसार सायकलिंग अँड वॉकिंगकरिता प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली. इंटर-सिटी फ्रीडम टू वॉक अँड सायकल मोहीम एक ते सव्वीस जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आली होती.
पायी चालण्याचे अनेक फायदे
या मोहिमेचे उद्देश सायकलिंग आणि चालण्याच्या फायद्यांबद्दल जनजागृती करणे हा होता. नागरिकांना त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल आणि वॉकसाठी प्रोत्साहित करणे तसेच शहरातील हरित वाहतुकीला प्रोत्साहन देणे हाही यामागचा उद्देश आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे नागरिकांना सायकल आणि पायी चालण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यासाठी एक ते सव्वीस जानेवारी या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली होती. नागपूर स्मार्ट सिटीच्या महाव्यवस्थापक (प्रभारी) पर्यावरण विभाग, डॉ. प्रणीता उमरेडकर यांनी ही माहिती दिली.