भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे… नागपूरमध्ये लागले पोस्टर्स; चर्चा तर होणारच

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नंतर आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नागपूरमध्ये पोस्टर्स लागले आहेत. त्यावर आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे... नागपूरमध्ये लागले पोस्टर्स; चर्चा तर होणारच
aaditya thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 8:33 AM

नागपूर : माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते प्रदूषित गावांची पाहणी करणार असून येथील स्थानिकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यापूर्वीच नागपूरमधील काही पोस्टर्सनी मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टर्सवर आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री संबोधण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत असून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

नागपूरच्या रामटेक आणि कन्हान येथील रस्त्यांवर आणि बस स्टॉपवर हे पोस्टर्स लागले आहेत. त्यावर भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत, असा मजकूर दिला आहे. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सवर बावनकर आणि मेश्राम यांचेही फोटो आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही या पोस्टर्सवर फोटो आहेत. हे पोस्टर्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. तसेच या पोस्टर्सवरील मजकुरामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे आज नागपुरात

दरम्यान, आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. कोराडी वीज प्रकल्पामुळे प्रदूषणाचा सामना करणाऱ्या नांदगाव आणि वराडा गावाला ते भेट देणार आहेत. यावेळी आदित्य ठाकरे गावकऱ्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत. आदित्य ठाकरेंसोबत पर्यावरण तज्ज्ञ लिना बुद्धे सुद्धा या दौऱ्यात सहभागी होणार आहेत. लिना बुद्धे गेल्या अनेक दिवसांपासून कोराडी वीज प्रकल्पाच्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर काम करत आहेत. आदित्य ठाकरेंना त्या इथल्या प्रदूषणाची माहिती देणार आहेत.

पोस्टरबाजू सुरूच

नागपूर आणि पोस्टरबाजी नवी नाही. नागपुरात या आधी देवेंद्र फडणवीस यांचेही पोस्टर्स लागले होते. भावी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचा या पोस्टर्सवर उल्लेख होता. त्यानंतर अजित पवार यांचेही नागपुरात पोस्टर्स झळकले होते. त्यावरही भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख होता. तर राज्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही पोस्टर्स झळकले होते. त्यावरही भावी मुख्यमंत्री असाच उल्लेख होता. त्यामुळे या पोस्टर्समुळे काही काळ चर्चा झाली होती. नेत्यांनाही या पोस्टर्सची दखल घेऊन खुलासा करावा लागला होता.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.