Nagpur Traffic | नेहरूनगर झोनमधील गडरलाईनचे काम सुरू; दोन मार्चपर्यंत वाहतूक मार्गात काय झालेत बदल?

नागपुरात नेहरूनगर झोनअंतर्गत प्रभाग 27 मधील राजेंद्रनगर चौक ते नंदनवन पोलीस स्टेशन टी-पॉईंट रोडपर्यंत मुख्य गडरलाईनचे काम प्रस्तावित आहे. या कामासाठी या मार्गावरील वाहतूक प्रतिबंधित करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश निर्गमित केलेत.

Nagpur Traffic | नेहरूनगर झोनमधील गडरलाईनचे काम सुरू; दोन मार्चपर्यंत वाहतूक मार्गात काय झालेत बदल?
नागपूर महानगरपालिकेअतंर्गत वयोश्री योजनेची सुरुवात करण्यात आली.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 5:30 AM

नागपूर : साउथ सिवरेज प्रकल्पांतर्गत नेहरूनगर झोनमधील राजेंद्रनगर चौक (Rajendranagar Chowk) ते नंदनवन पोलीस स्टेशन (Nandanvan Police Station) टी-पॉईंट रोडवरील मुख्य गडरलाईनचे काम सुरू झाले. या कामामुळे या मार्गावरील उजव्या बाजूकडील रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. वरील रस्त्यावरील वाहतूक डाव्या बाजूने किंवा इतर अन्य अंतर्गत रस्त्यांवरून वळविण्यासंदर्भातही मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. दोन फेब्रुवारी ते दोन मार्चदरम्यान सदर आदेश अंमलात राहणार आहे. सदर मार्गावर काम सुरू असताना संबंधित कंत्राटदार व कार्यकारी अभियंत्यांनी (Executive Engineer ) सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेण्याबाबत आयुक्तांनी आदेशित केले आहे. कामाच्या ठिकाणी काम सुरू केल्याची व काम पूर्ण झाल्यानंतर त्याची दिनांक, कंत्राटदाराचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक याचे फलक लावण्यात आले आहेत.

अशी घेतली जाणार काळजी

या रस्ता बांधकामामुळं पर्यायी मार्ग सुरू होत असलेल्या दोन्ही टोकावर तसेच बॅरिकेट्स जवळ रोडवर कंत्राटदाराने आपले सुरक्षा रक्षक नेमावेत. वाहतूक सुरक्षारक्षक, वाहतूक चिन्हांच्या पाट्या लावाव्यात. कोन्स, बॅरिकेट्स दारी रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स एल.ई.डी., बॅटन, ब्लिकर्स आदी संसाधने उपलब्ध करावेत. काम सुरू झाल्यानंतर जमिनीतून निघणारे मटेरियल्समुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी ते रस्त्यावर न टाकता त्यासाठी विशेष व्यवस्था करावी. कामादरम्यान पर्यायी मार्गावर निर्माण होणारे खड्डे तात्काळ बुजवून त्यावर सिमेंटीकरण, डांबरीकरण करावे. रोड पूर्ववत करणे, पर्यायी मार्ग सुरू होण्याच्या दोन्ही टोकांवर लोकांच्या लगेच निदर्शनास येईल, अशा स्वरूपात वळण मार्गाचे फलक लावावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

एकाच मार्गावरून कशी होईल दुतर्फा वाहतूक

रात्रीचे वेळी वाहनचालकांच्या माहितीकरिता एईडी डायव्हर्सन बोर्ड, बॅरिकेटिंगवर एलईडी माळ लावावे. उजव्या बाजूने दुतर्फा वाहतूक चालणार असल्याने त्या ठिकाणी अस्थायी रस्ता दुभाजक तयार करावा. एकाच मार्गावरून दुतर्फा वाहतूक वळवावेत. वाहतूक पोलिसांच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरिकांच्या सोयीकरिता व्यवहार्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. आदी सर्व नियमावलीचे कामाच्या ठिकाणी पालन होणे आवश्यक आहे. असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेशात नमूद केले आहे.

Nagpur | ताडोबा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार; विजय वडेट्टीवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक

नागपुरात सात वर्षे कॅन्सरची भीती घेऊन जगली महिला; शस्त्रक्रिया केल्यावर निघाले भलतेय काही!

Nagpur Crime | नागपूरच्या अल्पवयीन मुलीची गुजरातमध्ये विक्री, तिच्यासोबत तिथं नेमकं काय घडलं?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.