Nagpur | फुटाळ्यातील प्रेक्षक गॅलरीवरून वाद, गडकरींनी आणला निधी; राऊत म्हणतात, कामाची चौकशी व्हावी, हा वाद कशासाठी?

गडकरी या कामाचे कौतुक करतात, तर नितीन राऊत कामावर संशय व्यक्त करतात. महापालिका निवडणुका लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तर हा वाद सुरू झाला नसेल, ना असं नागरिकांना वाटतं.

Nagpur | फुटाळ्यातील प्रेक्षक गॅलरीवरून वाद, गडकरींनी आणला निधी; राऊत म्हणतात, कामाची चौकशी व्हावी, हा वाद कशासाठी?
फुटाळा तलावाचे संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 6:22 PM

नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांनी फुटाळ्यातील प्रेक्षक गॅलरी अनावश्यक असल्याचं म्हटलं. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कामाची चौकशी व्हावी, असं राऊत यांना वाटतं. शुक्रवारी नितीन राऊत यांनी लेजर शो आणि प्रेक्षक गॅलरीला भेट दिली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी नितीन गडकरी यांनीही या प्रकल्पाची पाहणी केली. कामाच्या प्रगतीचे कौतुक केले. यामुळं हा वाद कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महामेट्रोद्वारे प्रकल्पाचे काम

या प्रकल्पासाठी नितीन गडकरी यांनी रस्ते परिवहन मंत्रालयाच्या केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) मंजूर करून घेतला. या प्रकल्प महामेट्रोद्वारे पूर्ण करण्यात येत आहे. गडकरी या कामाचे कौतुक करतात, तर नितीन राऊत कामावर संशय व्यक्त करतात. महापालिका निवडणुका लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तर हा वाद सुरू झाला नसेल, ना असं नागरिकांना वाटतं.

राऊतांना आवडली नाही गॅलरीची जागा

नितीन राऊत हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. राऊत म्हणतात, नागपूर सुधार प्रन्यासनं फुटाळ्याचा खऱ्या अर्थानं विकास केला. हा परिसर नागपूरकरांसाठी अतिशय आवडीचं ठिकाण आहे. याठिकाणी प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात येत आहे. या गॅलरीमुळं तलावाचे दृश्य पाहण्यात अडचण होणार आहे. त्यांच्या दृष्टिकोणातूनही गॅलरी रोडच्या मागे चांगली झाली असती.

काम त्वरित करण्याची गडकरींची सूचना

नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री आहेत. राऊतांच्या या आरोपाला उत्तर देण्यासाठी गडकरी यांनी शनिवारी फुटाळा तलावाचा दौरा केला. गॅलरीचे निरीक्षण केले. यावेळी नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आणि महामेट्रोचे संचालक महेशकुमार हेही उपस्थित होते. गडकरी यांनी नासुप्रला लेजर शोचे काम त्वरित पूर्ण करण्याची सूचना महामेट्रोला केली. लेजर शो सुरू होईल. गॅलरी तयार झाल्यानंतर येथे आकर्षण नजराना दिसणार आहे. विदर्भातून येथे पर्यटक येतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Video – Mission Magar : नाग नदीत दिसली मगर, वनविभागाचा महिनाभर शोध; अखेर कशी आली जाळ्यात?

पिकअप व्हॅन झाडावर आदळून भीषण अपघात, चौघींचा मृत्यू, पाच जणी गंभीर

Nagpur Crime | भंडाऱ्यातून पळून नागपुरात आले, संसार थाटला; पण, दारूचे व्यसन लागले अन् प्रेमविवाह भंगला!

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.