नागपूर : तहसील पोलीस (Tehsil Police) स्टेशन हा गजबजलेला आणि मार्केट परिसर. यातील एका गेस्ट हाऊसमध्ये (In the guest house) तास पत्ते जुगार खेळला जात होता. त्यावर पैसे लावले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकत कारवाई केली. त्या ठिकाणी 16 जण पैसे लावून जुगार खेळत (Gambling) होते. पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेऊन कारवाई केली. सोबतच कॅश, मोबाईल, वाहन असा 3 लाखांच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आता शोध घेत आहे की, या ठिकाणी नेहमी अशाप्रकारे जुगार खेळल्या जात होता का आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, अशी माहिती पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी दिली.
दुसऱ्या एका घटनेत, नागपूर रेल्वे स्थानकावर मुबई येथून दुरांतो एक्सप्रेसने एक महिला आणि दोन पुरुष येत आहेत. त्यांच्याजवळ अमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. संगीता नावाची महिला बाहेर आली. तिच्यासोबत एक साथीदार होता. तर दुसरा साथीदार होंडा सिटी कार घेऊन त्यांना घ्यायला आला. संत्रा मार्केट परिसर गेटजवळ सापळा रचण्यात आला. बसलेल्या पोलिसांनी ताब्यात घेत महिलेच्या पर्सची तपासणी केली. त्यात एक पुडी मिळाली तर पुरुषाजवळ सुद्धा ड्रग मिळून आलं. दोघांजवळ 57 ग्राम मेफेड्रोन ड्रग मिळून आलं.
या ड्रग्सची बाजारात किंमत 5 लाख 70 हजार एवढी आहे. तर एक होंडा सिटी कारसुद्धा जप्त करण्यात आली. 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज सुरसे यांनी दिली. नागपुरात आलेलं हे ड्रग कोणाला दिलं जाणार होतं आणि मुंबईतून कोणी पाठविलं याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमुळं नागपुरात ड्रग्सचा व्यापार होत असल्याचं पुन्हा सिद्ध झालंय. त्यामुळं आता या ड्रग्स माफियांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.