Nagpur Ganapati Visarjan : नागपुरातील गणेश विसर्जन स्थळ एका क्लीकवर, मनपातर्फे वेब लिंक कार्यान्वित

गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये याकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात दहाही झोनमध्ये विविध 204 भागात कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे.

Nagpur Ganapati Visarjan : नागपुरातील गणेश विसर्जन स्थळ एका क्लीकवर, मनपातर्फे वेब लिंक कार्यान्वित
गणेश विसर्जन करायचंय, क्लीक करा विसर्जन स्थळांची माहिती मिळवा
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 9:39 PM

नागपूर : गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणपूरक गणेश विसर्जन (Ganapati Visarjan) करणे आवश्यक आहे. याकरिता नागपूर महापालिकेद्वारे शहरात झोननिहाय गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. विसर्जनासाठी शहरातील दहाही झोन अंतर्गत 204 विविध ठिकाणी 390 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जन स्थळांची संपूर्ण माहिती नागरिकांना घरबसल्या मिळेल. याकरिता नागपूर महापालिकेद्वारे (Municipality) वेब लिंक ( web link) जारी करण्यात आली आहे. मनपातर्फे जारी करण्यात आलेल्या या https://www.nmcnagpur.gov.in//visarjan-location लिंकवर जावे. नागरिक आपल्या घराजवळच्या विसर्जन स्थळाची माहिती मिळवू शकतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे.

204 भागात कृत्रिम तलावांची व्यवस्था

गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ नये याकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात दहाही झोनमध्ये विविध 204 भागात कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. तसेच 4 फुटाखालील सर्व श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टॅंकमध्ये व्हावे म्हणून चौकाचौकात व मैदानात कृत्रिम तलाव लावण्यात आले आहेत. शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर या प्रमुख तलावासोबतच अन्य तलावावर लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात करण्यात आली आहे. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. मनपाचे कर्मचारी व स्वयंसेवक निर्माल्य संकलन करणार आहेत. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेटिंग करण्यात येत आहे. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाइट लावण्यात आले आहेत. जागोजागी निर्माल्य कलशाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.

कुणाचे मिळणार सहकार्य?

पर्यावरणपूरक गणेश विसर्जन आणि निर्माल्य संकलनासाठी मनपाला मदत करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक वेगवेगळ्या विसर्जनस्थळी उपस्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन फुटाळा तलाव येथील एअरफोर्स बाजूने उपस्थित राहणार आहेत. तसेच सक्करदरा तलावातील किंग कोब्रा ऑर्गनायझेशन, रामनगरमधील इको-फ्रेंडली फाऊंडेशन, सोनेगाव येथील सीएसएफडी, एम्प्रेस मिल येथील तेजस्विनी महिला मंडळ, सोनेगाव तलावातील ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन आणि गांधीसागर तलाव परिसरात निसर्ग विज्ञान आदी संस्था उपस्थित राहणार आहेत. 4 फुटावरील मूर्तीचे विसर्जन कोराडी येथील कृत्रिम तलावात आणि अन्य ठिकाणी होईल. कोराडीमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था जसे क्रेन, बॅरिकेटिंग, रोषणाईची उत्तम सुविधा करण्यात यावी. तसेच स्वच्छता सुद्धा ठेवावी. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दखल घ्यावी, असे निर्देश आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.