Ganga Jamuna Red Light Area | नागपुरातील 200 वर्षांपासूनची वेश्यावस्ती बंद, महिला रस्त्यावर उतरणार

शहरातील 200 वर्षांपासून असलेली वेश्यावस्ती बंद करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी गंगाजमुना परिसरातील या गल्ल्या सील केल्या आहेत. या वस्तीत अवैध धंदे आणि कोरोना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती.

Ganga Jamuna Red Light Area | नागपुरातील 200 वर्षांपासूनची वेश्यावस्ती बंद, महिला रस्त्यावर उतरणार
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 4:44 PM

नागपूर : शहरातील 200 वर्षांपासून असलेली वेश्यावस्ती बंद करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी गंगाजमुना परिसरातील या गल्ल्या सील केल्या आहेत. या वस्तीत अवैध धंदे आणि कोरोना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र, या कारवाईनंतर येथे राहणाऱ्या महिला आक्रमक झाल्या असून आम्ही कसं जगायचं ? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच वस्ती पुन्हा सुरु केली नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ असा इशारादेखील या महिलांनी दिला आहे. (Ganga Jamuna red light area has been sealed by Npolice woman demands to reopen it)

वस्तीत अवैध धंदे सुरु असल्याचा आरोप

नागपुरातील गंगाजमुना परिसरात जवळपास दोनशे वर्षांपासून सुरु असलेली वेश्यावस्ती आहे. या वेश्यावस्तीत अनेक महिला राहतात. त्यांच्या चरितार्थ त्या कसाबसा भागवतात. मात्र, काही नागरिकांनी या वस्तीत अवैध धंदे होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच या ठिकाणी कोरोना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रारसुद्धा नागरिकांनी केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी हा परिसर सील केला. पोलिसांच्या या कारवाईनंतर आता येथील महिला आक्रमक झाल्या आहेत.

आमच्याशी लग्न कोण करणार? आम्ही जायचं कुठे ?

इथल्या वारांगणांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केलाय. आता आमच्याशी लग्न कोण करणार? आम्ही जायचं कुठे ? जगायचं कसं ? 200 वर्षांपासून हा परिसर सुरु आहे, आत्ताच का बंद केला? असा सवाल उपस्थित त्यांनी केलाय. तसेच ज्येष्ठ विदर्भवादी नेते जामुंतराव धोटे यांनी गंगाजमूना येथील वारांगणांना बहीण माणलं होतं. आता त्यांच्या पश्चात जामुंतवार धोटे यांची मुलगी ज्वाला धोटे यांनी आज वारंगणांची भेट घेतली.

बॅरीकेट्स हटवा अन्यथा रस्त्यावर उतरु

ज्वाला धोटे यांनी येत्या 15 ॲागस्टपर्यंत गंगाजमूना येथील बॅरीकेट्स हटवले नाही, तर रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे. नागपूर प्रशासन आगामी काळात यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

तो रोज स्मशानात जायचा, जीवाच्या आकांताने रडायचा, अखेर त्यानेही विपरीत केलं, मन विषण्ण करणारी घटना

VIDEO: पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, डोक्यात लोखंडी रॉड मारुन हत्येचा थरार सीसीटीव्ही कैद

Video : औरंगाबादच्या माळीवाड्यात भर दिवसा पेट्रोल पंपावर दरोडा, पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून रोकड लुटली

(Ganga Jamuna red light area has been sealed by Npolice woman demands to reopen it)

दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?.
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?.
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला.
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं.
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?.
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...