Crime | तेलंगणातून येत होता नागपुरात गांजा, बुटीबोरीत पोलिसांनी रचला सापडा; सात लाखांचा गांजा जप्त
या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हा गांजा तेलंगणा राज्यातून आणलेला होता. हा माल नागपूरकडे येत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
नागपूर : शहरात 31 डिसेंबरसाठी येणारा गांजा जप्त करण्यात आला. नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. बुटीबोरीजवळ 74 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. आर्टीका गाडीत गांजी तस्करी सुरू होती. हरियाणा पासिंगच्या गाडीला गांजासह जप्त करण्यात आलंय. तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक कण्यात आली.
गांजाची किंमत सात लाख
तेलंगाणातून चंद्रपूर मार्गानं नागपूर शहरात येत असलेल्या गांजाच्या तस्करी सुरू होती. यासंदर्भात बुटीबोरी पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. त्यांच्याकडून 7.47 लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईत गांजाशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेली गाडी आणि अन्य साहित्यासह पोलिसांनी 14 लाख 56 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बुटीबोरीजवळ नाकाबंदी
29 डिसेंबर रोजी, चंद्रपूर रोड येथून एका ईरटीगा कंपनीची कारमध्ये गांजाची तस्करी होत आहे, अशा गुप्त मिळालेल्या माहिती मिळाली. यावरून बुटीबोरी पोलिसांनी चंद्रपूर रोडवर सापळा रचला. पोलिसांनी या मार्गावर नाकाबंदी लावली. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास पोलिसांनी माहिती मिळालेली गाडी थांबवली. पोलिसांनी या गाडीची झडती घेतली असता वाहनाच्या डिक्कीत गांजा सापडला.
सात लाखांची कार, दोन आरोपी अटकेत
या प्रकरणी दिल्लीतील करावलनगरचा पवन राजकुमार कश्यप व उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगरचा दीपक धनिराम शर्मा (वय 27) यांना पोलिसानी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 36 पॉकिटातील 74 किलो गांजा जप्त केला. याची किंमत 7 लाख 47 हजार 800 रुपये आहे. शिवाय इरटीगा कंपनीची 7 लाख रुपयांची कार, मोबाईल असा एकूण 14 लाख 56 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हा गांजा तेलंगणा राज्यातून आणलेला होता. हा माल नागपूरकडे येत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची प्राथमिक माहिती आहे.