वेतनास विलंब होत असल्यामुळे संताप, नागपूरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

| Updated on: Jun 13, 2021 | 5:17 PM

पगार मिळण्यासाठी होणारा विलंब व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

वेतनास विलंब होत असल्यामुळे संताप, नागपूरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
NAGPUR PROTEST
Follow us on

नागपूर : पगार मिळण्यासाठी होणारा विलंब व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या काम बंद आंदोलनामुळे अर्ध्या नागपूर शहरातील कचरा उचलण्यात आला नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. (Garbage pickers protested in Nagpur for salary and other demands)

कर्मचाऱ्यांचा पगार देण्यास कंपनीकडून विलंब

नागपूर शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी महापालिकेने दोन खासगी कंपन्यांना दिली आहे. महापालिकेच्या 10 झोन पैकी प्रत्येकी पाच झोन या दोन कंपन्यांना विभागून दिलेले आहेत. यापैकी झोन क्रमांक 6 ते झोन क्रमांक 10 या झोनमधील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी या कंपनीकडे आहे. मात्र कंपनी शासन निर्णयानुसार कामगारांचे पगार करीत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ही कंपनी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यास विलंब करत आहे. आतापर्यंतचा 17 महिन्यांचा एरिअर्स मिळण्याससुद्धा विलंब करण्यात येतोय. यासह इतर आवश्यक सुविधा मिळत नसल्याचा आरोप कंपनीच्या सुमारे साडे आठशे कर्मचाऱ्यांनी केला आहे.

कर्मचाऱ्यांनी कचरा न उचलल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी

याच कारणांमुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी आज (13 जून) सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. या कर्मचाऱ्यांना आज शहरातील कचरा उचललेला नाही. या काम बंद आंदोलनामुळे गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर या पाच झोनमधील कचरा तसाच पडून आहे. कचरा उचलला नसल्यामुळे नागपुरातील या पाच झोनमध्ये दुर्गंधी पसरल्याचे पाहायला मिळत आहे.

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवू

दरम्यान, या आंदोलनामुळे नागपूकर त्रासले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी कंपनीतर्फे अधिकारी आले होते. परंतु या चर्चेतून ठोस काहीही निष्पन्न न झाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

इतर बातम्या :

खासगी शाळांच्या फी वाCategoriesढीचा प्रश्न पेटला, पालक संघटनांचं थाळी बजाओ आंदोलन

“प्रशांत किशोर यांनी दोनवेळा सांगितलंय, राहुल गांधींच पंतप्रधान होणार”

ई पाससाठी हनिमूनचं कारण, कोथिंबिरीची जुडी घेऊन गावभर हिंडला, कारणं ऐकून पोलिसांना हसू आवरेना

(Garbage pickers protested in Nagpur for salary and other demands)