Video – Nagpur Holi | लाकडं नव्हे शेणापासून तयार केलेले गो कास्ट जाळा, नागपुरात गोरक्षणनं शोधला पर्याय
होळीत लाकडं पेटविली जातात. यासाठी झाडं कापावी लागतात. लाकडं जळल्यानं प्रदूषण होते. पर्यावरणाचं नुकसान होतं. हे सारं थांबवायचं असेल तर कमी खर्चात तयार झालेले गो कास्ट जाळा. सण साजरा करा. पर्यावरणाचे रक्षण करा, असं आवाहन नागपुरातील गोरक्षणनं केलंय.
नागपूर : होलिका दहनासाठी (Holika Dahan) प्राचीन काळापासून लाकडं जाळली जातात. मात्र, यामुळे वृक्षतोड होते. पर्यावरणाला धोकासुद्धा असतो. होळीसाठी लाकडं जाळली जाऊ नये. होळी जाळण्याची परंपराही अबाधित राहावी. यासाठी गोरक्षणने पर्याय शोधला आहे. त्यांनी खास गायीच्या शेणापासून गो कास्ट (Go cast from cow dung) बनविले. म्हणजे शेणाची लाकडं जी होळी जाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. लाकडाची बचत म्हणजेच वृक्षतोड सुद्धा थांबू (deforestation can stop) शकते. गो कास्ट हे गायीच्या शेणावर प्रक्रिया करून बनवले जातात. त्यांना मशीनमध्ये लाकडाचा आकार दिला जातो. 3 ते साडेतीन फूट लांबीचे लाकडाप्रमाणे दांडके बनविले जातात.
गो कास्टचा खर्चही कमी
होळीमध्ये गायीच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱ्या आणि सोबत लाकडं असतात. मात्र आता गोवऱ्या आणि लाकडं या दोन्हीच काम हे गो कास्ट करू शकतात. सोबतच लाकडाच्या अर्ध्या किमतीत ते बनतात. अशी माहिती गोरक्षण प्रमुख प्रसन्ना पातूरकर यांनी दिली. गायीच्या शेणापासून गो कास्ट बनविण्याचा हा प्रयोग याच वर्षी करण्यात आला. मात्र तरी त्याला मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी यावर्षी गो कास्टची होळी जळणार आणि लाकडं वाचणार हे नक्की. गो कास्ट कसे बनतात. त्यांचा कसा वापर होऊ शकतो.
पाहा व्हिडीओ
होळीत जाळा गायीच्या शेणापासून तयार केलेले गो कास्ट. pic.twitter.com/IS9fWwUc36
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 16, 2022
काय आहे गो कास्ट
गो कास्ट हे गायीच्या शेणापासून तयार केले जाते. शेण जमा करून त्यापासून गो कास्ट तयार केलं जातं. शेणाचा वापर खत म्हणून केला जातो. त्यापासून ग्रामीण भागात गोवऱ्या तयार केल्या जातात. त्याचं हे सुधारित रूप म्हणता येईल. शेणाला लाकडासारखा आकार दिला जातो. त्यामुळं लाकडं पेटविल्याचा फिल येतो. पण, यामुळं प्रदूषण टाळता येतं. शिवाय खर्चही कमी. यामुळं विदर्भात गो कास्टची मागणी वाढली आहे.