पालकमंत्री विजय वडेट्टीवारांची बैलबंडीवरून मिरवणूक, पिपरी गावात केला रात्री मुक्काम, गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत

चंद्रपूर तालुक्यातलं दोन हजार लोकसंख्या असलेलं पिपरी हे गाव चंद्रपूरवरून 20 किमी अंतरावर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल रात्री साडेआठ वाजता गावात हजेरी लावली. त्यामुळं गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. जल्लोषात त्यांनी पालकमंत्र्यांचं स्वागत केलं.

पालकमंत्री विजय वडेट्टीवारांची बैलबंडीवरून मिरवणूक, पिपरी गावात केला रात्री मुक्काम, गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 10:13 AM

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातले पिपरी हे छोटसं गाव. तिथंल्या गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काल रात्री खुद्द पालकमंत्री विजय वडेट्टीवार गावात पोहचले. गावकऱ्यांनी त्यांना बैलबंडीवर बसवून त्यांची मिरवणूक काढली. पालकमंत्र्यांनी गावातल्या समस्या सोडविण्याचं आश्वासन दिलं.

चंद्रपूर तालुक्यातलं दोन हजार लोकसंख्या असलेलं पिपरी हे गाव चंद्रपूरवरून 20 किमी अंतरावर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल रात्री साडेआठ वाजता गावात हजेरी लावली. त्यामुळं गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. जल्लोषात त्यांनी पालकमंत्र्यांचं स्वागत केलं.

सोयाबीन, कापसाला योग्य भाव मिळावा

गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांची चक्क बैलबंडीवरून मिरवणूक काढली. त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांच्या समस्या ऐकूण घेतल्या. सोयाबीन आणि कापूस ही मुख्य पिके आहेत. सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही. कापसाची काही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळं सोयाबीन, कापसाला योग्य भाव मिळावा, अशी स्थानिकांनी मागणी केली. मंत्री गावात आल्यानं गावकरी जाम खूश होते.

काँग्रेसतर्फे जनसंवादचे आयोजन

स्थानिकांनी आपल्या विविध समस्या पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यापुढं मांडल्या. काँग्रेस पक्षाच्या वतीनं नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता. केंद्र सरकारविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष असल्यांच पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितलं.

केंद्र सरकारविरोधात नागरिकांत रोष

शेतीतील उत्पादनाला योग्य किंमत मिळत नाही. इंधन दरवाढीनं सामान्य नागरिक होरपडला जातोय. पेट्रोल, डिझेलच्या दरानं शंभरी पार केली आहे. सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या साऱ्या समस्या पिपरीवासियांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. केंद्र सरकार विरोधात गावात अधिक रोष असल्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं. गावातल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित केल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात दौरा केला. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याकडून नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विजय वडेट्टीवार चक्क गावात पोहचले. शेवटच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळं स्थानिकांमध्ये वडेट्टीवारांबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली.

इतर बातम्या 

कोराडी, खापरखेडा प्रकल्पाचा धोका, हवा-पाणी-माती प्रदूषित, पर्यावरणावर परिणाम

एकाच जागी वीज प्रकल्प नकोत, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात, शरद पवार यांचे मत

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.